● अथवास 2023च्या पाचव्या दिवशी जम्मू व काश्मीर आणि लदाखमधील व्यापार व वाणिज्याला बढावा.
● प्रदर्शनस्थळावरील 150हून अधिक स्टॉल्स हे आकर्षणाचे केंद्र, सहभागी सदस्यांनी काश्मिरी स्थानिक खाद्यपदार्थ व वस्त्रांचा आनंद घेतला.
● उद्योगाशी निगडित बैठकीमध्ये, उद्योग विकास व पुढील संधींबाबत जाणून घेण्यासाठी, उदयोन्मुख तसेच प्रस्थापित उद्योजकांचा मोठ्या संख्येने सहभाग.
● हा समारोह 17 मार्च रोजी सुरू झाला आणि 22 मार्च 2023 रोजी त्याची सांगता झाली.
मुंबई, 22 मार्च 2023: जम्मू व काश्मीर-लदाख व महाराष्ट्रा ह्यांना जोडणारा सामाजिक-आर्थिक कॉरिडॉर असलेल्या अथवास 2023 ह्या बहुप्रतिक्षित सहा दिवसीय प्रदर्शन व व्यापार मेळाव्याला तुफान यश मिळत असून, 22 मार्च 2023 रोजी ह्या समारंभाची सांगता झाली आहे. सोहळ्याच्या पाचव्या दिवशी मराठी सुपरस्टार स्वप्निल जोशीने विशेष पाहुणा म्हणून ह्या सोहळ्याला हजेरी लावली. 17 मार्च 2023 रोजी ह्या सोहळ्याचा शुभारंभ महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा ह्यांच्यासारख्या अनेकांच्या उपस्थितीत झाला. या तिन्ही राज्यांतील प्रतिनिधींनी बहुसंख्येने सहभाग घेतल्यामुळे सोहळा यशस्वी ठरला. जम्मू व काश्मीर आणि लदाखमधील १५०हून अधिक उद्योजकांनी प्रदर्शातन स्टॉल्स स्थापन केल्यामुळे उत्पादन व सेवांची वैविध्यपूर्ण श्रेणी बघायला मिळत आहे. केशर, अक्रोड, सुके जर्दाळू, स्ट्रॉबेरी, चेरी, आलुबुखार, काश्मिरी बदाम, अंजीर ह्यांसारख्या जम्मू व काश्मीरमधील खाद्यपदार्थांच्या स्टॉल्ससोबतच पश्मिना शाली, कानी शाली, गालिचे, नामदा अशा हस्तकलांचेही स्टॉल्सही येथे होते.
व्यापार व वाणिज्यविषयक संधी खुल्या करण्यासाठी तसेच महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीर व लदाख ह्यांच्यात नातेसंबंध प्रस्थापित करण्यासाठी ह्या सहा दिवसांच्या प्रदर्शन तसेच व्यापार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीर व लदाख ही फिल्म डेस्टिनेशन्स म्हणून विकसित करण्याचे, स्थानिक उद्योजकांचा संपर्क महाराष्ट्राच्या उद्योगपतींशी जोडून देण्याचे व जम्मू-काश्मीर व लदाखी संस्कृतीचा प्रसार करण्याचे उद्दिष्ट या प्रदर्शनापुढे आहे. उद्घाटनाच्या दिवसाची सुरुवात सी यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने झाली. त्यानंतर विधान परिषदेतील आमदार (एमएलसी) तसेच विधानसभा अध्यक्ष हमी समितीचे सदस्य व महाविजय 2024 चे निवडणूक प्रभारी श्रीकांत तारा पंडित, गोवर्धन इकोव्हिलेज इंडियाचे संचालक श्री. गौरांग दास, बालाजी इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडचे (बीआयपीएल) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तसेच दिघी पोर्ट लिमिटेडचे अध्यक्ष श्री. विजय कलंत्री, मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटरचे अध्यक्ष, सीरियल आँत्रप्रेन्युर व व्हेंचर कॅपिटलिस्ट तसेच सारा समूहाचे संस्थापक व सीईओ श्री. महमूद अन्सारी, एस. आर. इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंटचे अध्यक्ष, जेअँडके फेडरेशन ऑफ सोशल ऑर्गनायझेशन्स अँड ट्रस्ट्सचे अध्यक्ष तसेच व्हॉइस काश्मीरचे कायदेशीर सल्लागार श्री. रियाझ मलिक, एफएचडीच्या संस्थापक व संचालक श्रीमती माधुरी सहस्रबुद्धे, अथवास 2023 स्वागत समितीचे अध्यक्ष श्री. गगन मल्होत्रा, जेअँडके टेरिटरी डेव्हलपमेंटच्या प्रमुख श्रीमती रुचिता माने आणि गुलशन फाउंडेशनचे सचिव श्री. इरफान अली पिरजादे ह्यांसारख्या अनेक मान्यवरांची नंतर भाषणे झाली.
“जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतातील गुंतवणूकीचे केंद्र होण्याची प्रचंड क्षमता आहे आणि त्या दृष्टीने राज्याच्या उद्योजकतेच्या प्रवासाला बढावा देण्यासाठी तसेच जम्मू व काश्मीर आणि महाराष्ट्र ह्यांच्यातील व्यापार व वाणिज्य संबंध दृढ करण्यासाठी अथवास 2023चे आयोजन करण्यात आले. आघाडीचे गुंतवणूकदार व उद्योजकांनी तसेच महाराष्ट्र सरकारने ह्या कार्यक्रमाची खूप प्रशंसा केली आहे. जम्मू व काश्मीर आणि लदाख ह्या केंद्रशासित प्रदेशांसाठी प्रचंड वाढ आणि मुबलक संधी अथवास 2023द्वारे निर्माण केल्या जातील अशी आशा आम्हाला वाटते,” असे ड्रीमवर्थ सोल्युशन्सचे संचालक तसेच अथवास 2023च्या स्वागत समितीने अध्यक्ष श्री. गगन मल्होत्रा म्हणाले.
अथवास 2023च्या दुसऱ्या दिवशी आँत्रप्रेन्युरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामतर्फे (ईडीपी) व्यवसायविषय बैठक व सहकार्य बैठक ह्यांचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा आणि ईसी राष्ट्रीय शैक्षणिक मूल्यांकन व अधिमूल्यता परिषदेचे (नॅक) अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे हे मानाचे पाहुणे म्हणून या बैठकींना उपस्थित होते. त्यावेळी अन्य अनेक मान्यवरही उपस्थित होते. त्यांत डीआयसीसीआयचे श्री. मिलिंद कांबळे, सहकार भारतीचे श्री. संजय पाचपोर आणि सहकारभारतीचे राज्य कार्यकारणी सदस्य श्री. श्रीकांत पटवर्धन यांचा समावेश होता.
बिझनेस मीटमध्ये मेकिंग जेअँडके आत्मनिर्भर थ्रू ट्रेड अँड कॉमर्स हा उपक्रम जम्मू-काश्मीर व लदाख आणि महाराष्ट्र भागातील उद्योजक व गुंतवणूकदारांपुढे मांडण्यात आला. कल्पनांचे आदानप्रदान करण्यासाठी तसेच नवीन बिझनेस व्हेंचर्सच्या समन्वयासाठी उत्कृष्ट व्यासपीठ ठरलेल्या आँत्रप्रेन्युरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामने (ईडीपी) जम्मू-काश्मीर-लदाख व महाराष्ट्र भागातील तरुण उद्योजकांना, व्यवसायाचा विकास कसा करावा व बाजारपेठेतील वाढीच्या संधी शोधण्यासाठी, यशस्वीरित्या मदत केली आहे. जम्मू-कश्मीर-लदाख व महाराष्ट्र या भागांत आंतरप्रदेशीय सहकार्य दृढ करण्यात दुसऱ्या दिवशी सहकार्य बैठकीच्या माध्यमातून निर्णायक भूमिका बजावली गेली.
“जम्मू-काश्मीर व लदाखमधील उद्योग व पर्यटन क्षेत्रातील प्रमुख वाढीची क्षेत्रे व गुंतवणूक संधींचे दर्शन घडवणे हे आमचे प्राथमिक उद्दिष्ट अथवासद्वारे साध्य झाले ह्याचा आम्हाला आनंद आहे. असंख्य मान्यवरांकडून मिळालेल्या तज्ज्ञ सल्ल्यांच्या माध्यमातून ह्या व्यासपीठाने तिन्ही भागांतील स्थानिक व बाह्य व्यवसाय समूहांतील संपर्कांना बढावा दिला आहे,” असे जेअँडके, पार्कच्या टेरिटरी डेव्हलपमेंट प्रमुख श्रीमती रुचिता माने म्हणाल्या.
19, 20 आणि 21 मार्च रोजी सोहळ्याच्या तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या दिवशी जम्मू-काश्मीर व लदाखमधील तसेच महाराष्ट्रातील तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. तरुण उद्योजकांनी आंत्रप्रेन्युरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये (ईडीपी) सहभाग घेऊन धोरण व उद्योग उभारणी पद्धतींची बाजारपेठांची माहिती घेतली आणि विविध ठिकाणांच्या उद्योजकांच्या संवादात्मक सत्रात सहभागी होण्याचा अनुभवही घेतला.
अथवास विषयी – अथवास ही ब्रिटिश काश्मिरींची एक ना नफा तत्त्वावरील सामाजिक-सांस्कृतिक संस्था आहे. देशांतरितांना एकत्रित आणणे तसेच काश्मिरी संस्कृतीच्या वारशाला बढावा देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. आम्ही सेवाभावी, सांस्कृतिक व शैक्षणिक अशा अनेक क्षेत्रांत कामे करतो आणि समुदायांतही काम करतो. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही किंवा कोणत्याही बाहेरील संस्थेकडून निधी घेत नाही.