मुंबई, २० मार्च २०२३: पेटीएम पहिल्यांदाच पेटीएम यूपीआय लाइट बॅलन्स कार्यान्वित केल्यास जवळपास १०० रूपयांची खात्रीदायी वेलकम कॅशबॅक देत आहे. पेटीएम अॅपवर यूपीआय लाइट कधीच अयशस्वी न होणारी अत्यंत गतीशील पेमेंट्स करण्याची सुविधा देते.
यूपीआय लाइटसह वापरकर्ते बँक व्यवहारांच्या मर्यादेबाबत चिंता न करता लहान मूल्य असलेले अनेक यूपीआय पेमेंट्स करू शकतात. यामधून विनासायास पेमेंट्सचा अनुभव मिळतो. सुरक्षित ऑन-डिवाईस बॅलन्स यूपीआय लाइट दैनंदिन लहान मूल्याचे व्यवहार अत्यंत जलद करते, ज्यामुळे प्रत्येक पेमेंटसाठी यूपीआय पिन क्रमांक प्रविष्ट करण्याची गरज दूर होते.
कार्यान्वित झाल्यानंतर यूपीआय लाइट वापरकर्त्यांना जवळपास २०० रूपयांपर्यंतचे त्वरित व्यवहार करण्याची सुवि…