जागतिक हॉकी स्पर्धेतील अपयशानंतर भारताने जगज्जेत्या जर्मनीलाच पराभूत करून प्रो लीग हॉकीच्या नव्या हंगामास सनसनाटी सुरुवात केली होती.
हॉकी प्रो लीग 2023 स्पर्धेत भारताने जर्मनीविरुद्ध 6-3 असा जबरदस्त विजय मिळवला आहे. जर्मनीचा कर्णधार मॅट्स ग्रॅम्बुशने सामन्याच्या सुरुवातीलाच पहिल्या तीन मिनिटांत पेनल्टी कॉर्नरवर गोल करून आपल्या संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली होती. पंरतू नंतर भारतीय संघाने चांगल्या खेळाचे प्रदर्शन करत जर्मनीला पराभूत केले आहे. जुगराज सिंग, अभिषेक, सेल्वम कार्ती आणि कर्णधार हरमनप्रीत सिंग यांनी गोल केले. मध्यातंराच्यावेळी भारताने 4-2 अशी आघाडी घेतली होती. मध्यांतरानंतर जर्मनीकडून पुन्हा एकदा सुरुवातीच्या काही मिनीटातच गोल करत सामन्यात आघाडी घेण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यानंतर सेल्वम कार्ती आणि अभिषेकने पुन्हा एक-एक गोल करत भारताला 6-3 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. यांनतर भारतीय संघाने जर्मनीला गोल करण्याची एकही संधी दिली नाही.
भारतीय संघाकडून सेल्वम कार्ती आणि अभिषेकची चमकदार कामगिरी करत प्रत्येक दोन गोल केले. या वर्षाच्या सुरुवातीला विश्वचषकात निराशाजनक कामगिरीमुळे नवव्या स्थानावर राहिल्यानंतर घरच्या प्रेक्षकांसमोर भारतीय संघाने जबरदस्त खेळ केला आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ चांगली कामगिरी करताना दिसत आहे. विशेषत: कर्णधाराने दोन सामन्यांतून पाच गोल केले आहेत. या वर्षी प्रो लीगमधील एकूण गोलतालिकेतही तो आघाडीवर आहे. त्याच्या दमदार खेळाच्या जोरावर भारताने काल ऑस्ट्रेलियावर 5-3 असा विजय प्राप्त केला होता.
जागतिक हॉकी स्पर्धेतील अपयशानंतर भारताने जगज्जेत्या जर्मनीलाच पराभूत करून प्रो लीग हॉकीच्या नव्या हंगामास सनसनाटी सुरुवात केली होती. राऊरकेलाच्या बिरसा मुंडा स्टेडियमवर खेळला गेला.