· स्वतंत्र आय केयर ब्रँड म्हणून वासन आय केयरचे अस्तित्व यापुढे देखील कायम राहणार.
· एएसजी आय हॉस्पिटल्सचे धोरणात्मक व्हिजन, व्यावसायिक व्यवस्थापन आणि संचालनात्मक नैपुण्याचा लाभ वासन आय केयरला मिळणार
· दोन आघाडीचे आय केयर ब्रँड्स एकत्र येत असल्याने भारतात आय केयर सेवासुविधांचे सर्वात मोठे नेटवर्क निर्माण होईल, देशभरातील रुग्णांसाठी हे लाभदायक ठरेल.
राष्ट्रीय: डोळ्यांच्या देखभालीच्या सेवासुविधा पुरवणाऱ्या रुग्णालयांची भारतातील आघाडीची शृंखला आणि सर्वसमावेशक नेत्रचिकित्सा सेवा पुरवणाऱ्या एएसजी आय हॉस्पिटल्सने वासन आय केयरचे संचालनात्मक नियंत्रण आपल्या हाती घेतले असल्याची घोषणा केली आहे. सर्व औपचारिकता पूर्ण करून मालकीहक्काचे हस्तांतरण करण्यात आल्यानंतर एएसजी आय हॉस्पिटल्सने हे पुढचे पाऊल उचलले आहे. ५२६ कोटी रुपयांच्या बोली रकमेसह अधिग्रहणासाठी राष्ट्रीय कंपनी अधिनियम न्यायाधिकरणाच्या चेन्नई खंडपीठाने दिनांक ३ फेब्रुवारी २०२३ रोजी दिलेल्या मान्यतेनंतर ठराव योजनेस ९८% मतांसह क्रेडिटर्स कमिटीने मान्यता दिली. अधिग्रहण यशस्वीपणे पूर्ण होणे हे एएसजी आय हॉस्पिटल्सने भारतातील नवीन आणि भरपूर संधी उपलब्ध असलेल्या पण त्यांचा उपयोग करून घेण्यात आलेला नाही अशा बाजारपेठांमध्ये विस्तार करून दर्जेदार नेत्र देखभाल सेवांसाठी उपलब्ध करवून देण्याच्या एएसजी आय हॉस्पिटल्सच्या वाटचालीतील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
वासन आय केयरच्या समावेशामुळे एएसजी आय हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमध्ये संपूर्ण भारतभरात १५० पेक्षा जास्त रुग्णालये येतील. देशभरातील २१ राज्यांमध्ये पसरलेले हे सर्वात मोठे नेटवर्क ठरेल. या धोरणात्मक अधिग्रहणामुळे आरोग्यसेवा उद्योगक्षेत्रात एएसजीचे स्थान तसेच भारतभरातील बाजारपेठांमधील त्यांची उपस्थिती अधिक मजबूत होईल.
एएसजी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर डॉ अरुण सिंघवी यांनी सांगितले, “२००५ सालापासून एएसजी आय हॉस्पिटल्सचे डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली चालवण्यात येणारे मॉडेल क्लिनिकल उत्कृष्टता व सर्वांसाठी डोळ्यांची दर्जेदार देखभाल यासाठी नावाजले जात आहे. या धोरणात्मक अधिग्रहणानंतर दक्षिण भारतातील आमचा नेटवर्क विस्तार होत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. डोळ्यांच्या देखभालीशी निगडित सेवासुविधा क्षेत्रात वासन आय केयर हे एक आदरणीय नाव आहे. एक स्वतंत्र ब्रँड म्हणून त्यांची ओळख यापुढे देखील कायम राहील. एएसजी परिवारात वासन टीमचे स्वागत करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. डोळ्यांच्या देखभालीच्या दर्जेदार सेवासुविधा सर्वांना मिळाव्यात आणि भारतभरात जीवन गुणवत्तेमध्ये सुधारणा व्हाव्यात या आमच्या मिशनमध्ये आता त्यांचाही सहभाग असणार आहे. रुग्णांना अतुलनीय देखभाल सेवा देत असतानाच हे हस्तांतरण देखील सुरळीतपणे पार पडावे यासाठी वासन इकोसिस्टिमच्या सर्व हितधारकांसोबत अतिशय जवळून काम करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
एएसजी आय हॉस्पिटल्सच्या गुंतवणूकदारांमध्ये फाउंडेशन होल्डिंग्स, जनरल अटलांटिक आणि केदारा कॅपिटल यांचा समावेश असून ते यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहेत. उच्च गुणवत्तापूर्ण नेत्र देखभाल सेवा प्रदान करून भारतातील आघाडीची आय केयर फ्रॅन्चायजी बनण्याचे व्हिजन पूर्ण करण्यासाठी एएसजी व वासन यांच्या टीम्ससोबत ते जवळून काम करतील.
एएसजी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर, फाउंडेशन होल्डिंग्स आणि डायरेक्टर श्री. आकाश सचदेव यांनी सांगितले, “हे धोरणात्मक अधिग्रहण एएसजी व वासन यांच्यासाठी तसेच नेत्र देखभाल सेवासुविधा क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक टप्पा आहे. एएसजीसाठी वासनचे अधिग्रहण भौगोलिकदृष्ट्या अतिशय योग्य ठरणार आहे. दक्षिण भारतातील वाढलेली उपस्थिती व खऱ्या अर्थाने संपूर्ण भारतभरात प्रसार झालेला, जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवा प्रदान करणारा प्लॅटफॉर्म म्हणून एएसजी नावारूपास यावा यासाठी ही एक लक्षणीय संधी आहे. आम्हाला खात्री आहे की, वासन आय केयरला एएसजी आय हॉस्पिटल्सच्या धोरणात्मक व्हिजन, व्यावसायिक व्यवस्थापन व संचालनात्मक नैपुण्याचे अनेक लाभ मिळतील.”
एएसजी आय हॉस्पिटल्स हा देशातील एक सर्वात मोठा व सर्वाधिक विश्वसनीय नेत्र देखभाल सेवासुविधा पुरवणारा ब्रँड बनला आहे. भारतात १७ राज्यांमध्ये ५४ पेक्षा जास्त नेत्र रुग्णालयांचे नेटवर्क त्यांनी उभारले आहे. वासन आय केयरचे अधिग्रहण हा एक महत्त्वाचा टप्पा आहे कारण यामध्ये देशातील दोन आघाडीचे आय केयर ब्रँड्स एकत्र येऊन अत्याधुनिक तंत्रज्ञान व नैपुण्यासह उच्च गुणवत्तापूर्ण नेत्र देखभाल सेवासुविधा प्रदान करण्यासाठी समन्वयपूर्वक काम करतील.
एएसजी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर डॉ विकास जैन यांनी सांगितले, “एएसजी आय हॉस्पिटल्समधील आमच्या संचालनात्मक उत्कृष्टता, तांत्रिक नैपुण्ये यांचा तसेच देशातील काही सर्वोत्तम सुपर-स्पेशालिस्ट नेत्र विशेषज्ञांना एकत्र आणण्यासाठी आम्ही जो प्लॅटफॉर्म उभारला आहे त्याचा आम्हाला अतिशय अभिमान आहे. यामुळे आमची एक वेगळी ओळख निर्माण झाली असून सर्वोत्तम क्लिनिकल परिणाम मिळवून देण्यात आम्ही सक्षम बनलो आहोत. आमच्याकडील अत्याधुनिक सुविधा, तंत्रज्ञान आणि उच्च प्रशिक्षित नेत्र चिकित्सक उच्च गुणवत्तापूर्ण, सहज मिळवण्याजोग्या नेत्र देखभाल सेवा पुरवण्याची आमची वचनबद्धता दर्शवतात. आमच्या या बलस्थानांचा वापर करून वासन आय केयर आमच्यावर विश्वास ठेवून उपचार करवून घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना सर्वोत्तम देखभाल सेवा पुरवतील.”
जागतिक नेत्र आरोग्याबाबत लॅन्सेट ग्लोबल हेल्थ कमिशनच्या अहवालानुसार, भारतात जवळपास ६२ दशलक्ष व्यक्तींना दृष्टिदोष आहे, ८ दशलक्ष व्यक्ती अंध आहेत. मोतीबिंदू व डायबेटिक रेटिनोपॅथी यावर वेळीच उपचार केले न गेल्यास ते नेत्र विकार व अंधत्वास कारणीभूत ठरू शकतात. दुसरीकडे भारतात जवळपास नेत्र चिकित्सकांची संख्या अवघी २५,००० व ऑप्टोमेट्रीस्ट्स फक्त ४५,००० आहेत. यापैकी बहुसंख्य नेत्र चिकित्सक व ऑप्टोमेट्रीस्ट्स शहरी भागांमध्ये आहेत. देशभरात १,२५,००० नेत्र चिकित्सकांची आवश्यकता आहे. छोटी शहरे व ग्रामीण भागांमध्ये नेत्र चिकित्सक व ऑप्टोमेट्रीस्ट्सची कमतरता आहे. द्वितीय व तृतीय श्रेणी शहरांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या एएसजी आय हॉस्पिटल्ससारख्या शृंखलांमुळे दर्जेदार नेत्र देखभाल सेवासुविधा मिळणे शक्य होते आणि दृष्टी पूर्णपणे जाण्याच्या केसेसची संख्या कमी होण्यात मदत होते. नेत्र विकार असलेल्या रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी पायाभूत सोयीसुविधांचा विस्तार, नेत्र विशेषज्ञांना प्रशिक्षण देणे आणि तंत्रज्ञानातील नवकल्पनांचा अधिक चांगला उपयोग करणे आवश्यक आहे. एएसजी आय हॉस्पिटल्स आणि वासन आय केयर भारतात नेत्र आरोग्यामध्ये प्रगती साध्य करण्यात लक्षणीय भूमिका बजावतील.