पाऊण तास मदत न मिळाल्याची प्रत्यक्षदर्शिंची माहिती
मेहकर, बुलढाणा/NHI/-
कारमध्ये होते एकूण 13 जण; मेहकर-सिंदखेडराजा दरम्यान घटना
समृद्धी महामार्गावरील मेहकर-सिंदखेडराजा दरम्यान (जि. बुलढाणा) लोणार तालुक्यातील शिवणी पिसा नजीक इर्टिगा गाडीला भीषण अपघात झाला आहे. यात सहा जण जागीच ठार झाले. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. तर बहुतांश जखमी तसेच मृत हे छत्रपती संभाजीनगरमधील एन-11 मधील रहिवाशी असल्याची माहिती मिळाली आहे.
हा अपघात रविवारी सकाळी लोणार तालुक्यातील शिवणी पिसा ते दुसरबीड दरम्यान घडला. भरधाव वेगातील इर्टिगा गाडी ही रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरमध्ये घुसली व तीन ते चार पलट्या मारून दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर उलटली. या अपघातामध्ये चार जण घटनास्थळीच ठार झाले तर दोन जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू
- हौसाबाई भरत बर्वे (वय 60)
- श्रद्धा सुरेश बर्वे (वय 28)
- किरण राजेन्द्र बोरुडे (वय 35)
- भाग्यश्री किरन बोरुडे (वय 28)
- प्रमिला राजेन्द्र बोरुडे (वय 58 )
- जानवी सुरेश बरवे (वय 12 वर्ष)
जखमींवर छत्रपती संभाजीनगरात उपचार सुरू
- नम्रता रविन्द्र बर्वे (वय 32)
- रुद्र रविन्द्र बर्वे (वय 12)
- यश रविंद्र बर्वे वय 10 वर्षे
- सौम्या रविंद्र बर्वे (वय 4)
- जतीन सुरेश बर्वे (वय 4)
- वैष्णवी सुनिल गायकवाड (वय19)
- सुरेश भरत बर्वे (वय 35)
यापूर्वी याच पुलावर दोन अपघात
दरम्यान समृद्धी महामार्गावर बनविण्यात आलेले पुल हे थोडे उंच असल्याने भारधाव वाहने या पुलावरून जाताना अनियंत्रित होतात व त्यामुळे अपघात होत असल्याचे ही समोर आल आहे. आजच्या अपघातस्थळी ही कार एका छोट्या पुलावरून जात असताना अनियंत्रित झाली. यापूर्वी याच पुलावर दोन अपघात झालेले आहे तरी समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी या पुलाची दुरुस्ती करून भविष्यात होणारे अपघात टाळावे.
पाऊण तास मदत नाही
धक्कादायक बाब म्हणजे अपघात झाल्यावर पाऊण तास अपघातग्रस्तांना मदत मिळाली नाही, अशी स्थानिक व प्रत्यक्षदर्शिंनी याबाबत माहिती दिली असून यामुळे समृद्धी महामार्गावरून प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आल्याचे दिसत आहे. मेहकर टोल प्लाझा येथून फक्त 10 किलोमीटर वर झालेल्या अपघातातील जखमींना तत्काळ मदत न मिळाल्याने अवस्था गंभीर झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी व स्थानिक मदतकार्य करणारे व्यक्ती सरपंच समाधान पिसे संदीप पिसे खुशालराव वाघ यांनी दिली आहे
देवदर्शनासाठी जात होते, MSEB चा कर्मचारी
अपघातग्रस्त ईर्टीगाचा क्रमांक एम एच 20 – 8962 आहे. कारचे मालक हे सुरेश बर्वे हे असल्याची माहिती आहे. ते एन-11 द्वारकानगरचे रहिवासी असून एमएसईबीचा कर्मचारी आहे. ते त्यांच्या कुटुंबासह देवदर्शनासाठी समृद्धी महामार्गावरून जात होते.
अपघात एवढा भीषण होता की, समृद्धी महामार्गावर मेहकरजवळ नागपूर कॉरिडॉरवर वाहतूक काही काळ पोलिसांनी थांबविली होती. तर या अपघातातील मृत आणि जखमी सर्व व्यक्ती एकाच कुटुंबातील असल्याचे बोलले जात आहे.
समृद्धी महामार्गावरील आत्तापर्यंतच्या अपघाताच्या घटना …
- नागपूर जिल्ह्यातील टोलनाक्याजवळच दोन कारचा अपघात, अपघातात गाडीचा अक्षरशः चुराडा.
- जालना जिल्ह्यातील सोमठाण्याजवळ कार लोखंडी खांबाला धडकली.
- पिंप्रीमाळी (जि. बुलढाणा) परिसरात दुभाजकाच्या खड्डयात ट्रक उलटून अपघात.
- वाशिममध्ये केनवड येथे गॅस सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने अपघात.
- औरंगाबाद जिल्ह्यातील घायगाव शिवारात धावत्या कारने अचानक पेट घेतला.
- अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथे लग्नवन्हाडाच्या कारचा टायर फुटल्याने अपघात.
- सिंदखेडराजा तालुक्यात झालेल्या कार अपघातात बालकासह तीनजण जखमी.
- जालना येथील निधोना इंटरचेंजजवळ ट्रक उलटल्याने अपघात.
अपघातस्थळावरील फोटो….
हे ही वाचा
समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच:नागपूरहून औरंगाबादला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, 1 ठार 20 जखमी
नागपूरहून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या राही ट्रॅव्हल्स या खासगी बसचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजाजवळील असोला फाट्याजवळ हा अपघात झाला. अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून 20 प्रवासी जखमी झाले आहेत