10 लाख ते अमर्यादित विम्याच्या रकमेसह प्लॅटिनम हेल्थ प्लॅनचा शुभारंभ
पुढील काही वर्षांत आरोग्य हे, एको (ACKO) साठी सर्वात मोठ्या श्रेणींपैकी एक बनेल
NHI/ MUMBAI / मार्च, 2023: ग्राहकांना योग्य किंमत, सुविधा आणि उत्कृष्ट ग्राहक अनुभवासह केंद्रस्थानी आणण्याच्या उद्देशाने, एको (ACKO)ने रिटेल हेल्थ इन्शुरन्स विभागात प्रवेश केला आहे. शून्य कमिशन, शून्य कागदपत्रे, त्वरित नूतनीकरण, एकाच दिवशी क्लेम सेटलमेंट आणि दाव्यांवर अॅप-आधारित अद्यतने यासारख्या वैशिष्ट्यांसह, एको (ACKO) खऱ्या अर्थाने ग्राहकांच्या विम्याचा अनुभव घेण्याच्या पद्धतीत एक ‘स्वागतार्ह बदल’ आहे.
आरोग्य विमा क्षेत्रात एको (ACKO)च्या प्रवेशामुळे, उद्योगात अधिक नावीन्य आणि स्पर्धा येईल आणि शेवटी ग्राहकांना अधिक पर्याय आणि चांगली सेवा मिळेल. ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन, वैयक्तिकृत ऑफर, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि डेटा अंतर्दृष्टीसह, एको (ACKO)चे उद्दीष्ट हे, आमच्या ग्राहकांच्या सर्व संरक्षण गरजा पूर्ण करण्यासाठी एक थांबा गंतव्य (वन-स्टॉप डेस्टिनेशन) बनणे आहे.
मोठ्या आरोग्य बाजारपेठेत प्रवेश वाढविण्यासाठी आणि कोविडनंतर आरोग्य विम्याच्या वाढत्या मागणीचे भांडवल करण्यासाठी, एको (ACKO)ने सर्वोत्तम वैशिष्ट्यांसह प्लॅटिनम आरोग्य योजना सुरू केली आहे:
भारतात, आम्ही आरोग्य विम्यात आणि कव्हरेजच्या रकमेतही अग्रेसर आहोत. या दोन्हींमध्ये सुधारणा करण्यासाठी आम्ही आमचा सुपर टॉप-अप प्लॅन देखील लाँच केला आहे, जिथे ग्राहक त्यांच्या सध्याच्या विम्याची रक्कम 10 लाख रुपयांच्या कमी किंमतीत, अमर्यादित करू शकतात. एको (ACKO) प्लॅटिनम हेल्थ प्लॅन, भारतातील 7100 हून अधिक रुग्णालयांच्या नेटवर्कवर कॅशलेस दावे प्रदान करतो आणि वर्षाच्या प्रत्येक दिवशी 24×7 सहाय्य देखील प्रदान करतो.
आरोग्य विम्याकडे पाहण्याचा एको (ACKO)चा दृष्टीकोन, मोटर इन्शुरन्सप्रमाणेच आहे, जिथे त्यांनी ग्राहकांना सर्वोत्तम किंमतीत उद्योगातील अग्रगण्य उत्पादने दिली आहेत आणि श्रेणी आणि ब्रँड जागरूकता निर्माण करण्यासाठी ब्रँडमध्ये गुंतवणूक केली आहे. ग्राहकांना थेट उद्योगातील अग्रगण्य उत्पादने आणि अतुलनीय मूल्य देऊन आरोग्य श्रेणीत उत्तेजना निर्माण करण्याची कंपनीची योजना आहे.
रिटेल हेल्थ इन्शुरन्स क्षेत्रात एको (ACKO)च्या प्रवेशाची घोषणा करताना एको (ACKO)चे मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. संजीव श्रीनिवासन म्हणाले, “आरोग्य विमा हा भारतातील वेगाने वाढणारा उद्योग आहे. आरोग्यसेवेचा वाढता खर्च आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेवर वाढलेले लक्ष, यामुळे आरोग्य विमा उत्पादनांना मागणी वाढत आहे. तथापि, आरोग्य विमा उद्योगातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे ऑफर, केलेल्या उत्पादनांमध्ये गुंतागुंत आणि पारदर्शकतेचा अभाव. आमच्या आरोग्य योजना सुरू करून, सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्ये आणि अद्वितीय खरेदी आणि दाव्यांचा अनुभव प्रदान करत असताना, आम्ही या समस्यांना समोरासमोर तोंड देण्याचे उद्दीष्ट ठेवतो.”
“आमच्या डायरेक्ट-टू-कन्झ्युमर दृष्टिकोनामुळे, ग्राहकांना परवडणाऱ्या आणि वैयक्तिकृत पर्यायांसह हेल्थकेअर कव्हरेज खरेदी करण्याचा आणि व्यवस्थापित करण्याचा एक असा नवीन मार्ग अनुभवता येऊ शकतो, ज्यास एकेकाळी अशक्य मानले जात होते. नव्या पिढीतील ग्राहक, विम्याशी कसा परस्पर संवाद साधतात आणि त्याचा कसा अनुभव घेतात, हे बदलण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असेही ते म्हणाले.
एको (ACKO)ने गेल्या 2 वर्षांत ग्रुप मेडिकल कव्हरमध्ये आपले अस्तित्व प्रस्थापित केले आहे आणि सध्या या ऑफरद्वारे 800,000 कुटुंबातील सदस्यांचा विमा काढला आहे. या उपक्रमामुळे एको (ACKO)ला आरोग्य विमा उत्पादनांबद्दल ग्राहकांच्या अडचणी आणि अपेक्षा समजून घेण्यास मदत झाली, ज्यामुळे कंपनीने रिटेल हेल्थ इन्शुरन्समध्ये विस्तार केला आहे.