मुंबई : प्रतिनिधी/NHI
माझगाव क्रिकेट क्लब आयोजित पहिल्या नवी मुंबई प्रीमियर लीग-एनएमपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये वाशी वॉरियर्सने पाचव्या साखळी सामन्यामध्ये दुसऱ्या विजयाची नोंद केली. वाशी वॉरीयर्सने अष्टपैलू धृमील मटकर, प्रणव धनावडे, अतुल सिंग आदींच्या खेळामुळे अंबरनाथ अवेन्जर्सचा ५ विकेटने पराभव केला. सलामीवीर जय बिस्ताची अर्धशतकी खेळी अंबरनाथ अवेन्जर्सचा पराभव टाळू शकली नाही. अष्टपैलू धृमील मटकरला सामनावीर पुरस्काराने एनएमपीएलचे कमिशनर प्रदीप कासलीवाल यांनी गौरविले. याप्रसंगी एनएमपीएलचे चेअरमन शाह आलम शेख, अभिजित घोष, विरेन जेठवा, विनोद भानुशाली आदी उपस्थित होते.
दादोजी कोंडदेव स्टेडीयमवर सलामीवीर जय बिस्ताने (५२ चेंडूत ७८ धावा) आक्रमक फलंदाजी करूनही अंबरनाथ अवेन्जर्सला मर्यादित २० षटकात ५ बाद १४२ धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली. अतुल सिंगने १८ धावांत ३ बळी घेतले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करतांना सलामीवीर प्रणव धनावडे (३७ चेंडूत ४२ धावा), जितेश राऊत (२२ चेंडूत २६ धावा) व धृमील मटकर (१७ चेंडूत नाबाद २७ धावा) यांनी दमदार फलंदाजी केली. परिणामी वाशी वॉरीयर्सने विजयी पल्ला १७.४ षटकात ५ बाद १४३ धावा फटकावून साकारला. या विजयामुळे वाशी वॉरीयर्सच्या खात्यात साखळी ४ गुणांची नोंद झाली आहे.
****