प्रतिनिधी /NHI
मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, आरएमएमएस व आयडियल ग्रुप तर्फे क्रीडाप्रेमी आमदार सचिनभाऊ चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेचा ड्रॉ रुग्णालयीन क्रिकेटपटूंच्या उपस्थितीत राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या हस्ते काढण्यात आला. स्पर्धेच्या अंतिम फेरी विभागवारीमधील अ गटात कस्तुरबा हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल, ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल-नवी मुंबई संघांचा तर ब गटात लीलावती हॉस्पिटल, रहेजा हॉस्पिटल, जे.जे. हॉस्पिटल, सेव्हन हिल्स हॉस्पिटल संघांचा समावेश आहे.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष व क्रीडाप्रेमी आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या ५१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून यंदाही आंतर हॉस्पिटल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन १० ते २० मार्च दरम्यान शिवाजी पार्क व क्रॉस मैदान येथे होणार आहे. विजेत्या-उपविजेत्या संघांना आमदार सचिनभाऊ चषक व वैयक्तिक सन्मान पदकांचा पुरस्कार दिला जाणार आहे. सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटू, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज तसेच प्रत्येक संघातील उत्कृष्ट खेळाडूस विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
यावेळी इंटकच्या केंद्रीय चिटणीसपदी निवड झाल्याबद्दल गोविंदराव मोहिते यांचा विशेष सत्कार शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण, लीलावती हॉस्पिटलचे सलामीवीर मनोहर पाटेकर, रहेजा हॉस्पिटल क्रिकेट संघाचे कप्तान अविनाश डांगळे, क्रिकेटपटू चंद्रकांत करंगुटकर यांनी रुग्णालयीन क्रिकेट संघांच्यावतीने केला. सत्कार प्रसंगी क्रीडाप्रेमी गोविंदराव मोहिते यांनी आपल्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त १ जूनपूर्वी आंतर हॉस्पिटल क्रिकेट स्पर्धा आयोजनाचा मनोदय व्यक्त केला.
ही पण वाचा : https://newshindindia.com/news/5326/