डोंबिवली/NHI
डोंबिवली-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या संत सावळाराम महाराज क्रिडा संकुलातील तरण तलाव येत्या शनिवारपासून नागरीकांकरीता खुला करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे माजी स्थायी समिती सभापदी दीपेश म्हात्रे यांनी दिली आहे.
या तरण तलावाची पाहणी म्हात्रे यांनी आज केली. म्हात्रे यांनी सांगितले की, कोरोना काळात हा तरण तलाव नागरीकांसाठी बंद करण्यात आला होता. कारण तरण तलावाच्या शेजारीच महापालिकेने कोविड सेंटर आणि रुग्णालय सुरु केले होते. कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ नये याकरीता हा तलाव बंद होता. तलाव बंद स्थितीत असल्याने त्याची देखभाल दुरुस्ती करुन तो पुन्हा नागरीकांसाठी खुला करण्याकरीता सज्ज करण्यात आला आहे. त्यासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. शनिवारपासून हा तलाव नागरीकांकरीता खुला केला जाणार आहे. हा तलाव दोन सत्रत खुला राहणार आहे. पाच वर्षापूढील वयाच्या सगळ्या मुला मुलींसह नागरीकांना हा तलाव पोहण्यासाठी खुला केला जाईल. त्यासाठी जे काही माफत शुल्क महापालिकेने आकारले आहे. ते त्यांना द्यावे लागणार आहे.
काही दिवसापूर्वी क्रिडा संकुलात टेबल टेनिस कोर्टचे लोकार्पण करण्यात आले. कोरोनानंतर बंद असलेल्या सोयी सुविधा पुन्हा नागरीकांकरीता खुल्या करण्यात येत आहेत.