mumbai : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, आरएमएमएस व आयडियल ग्रुपतर्फे क्रीडाप्रेमी आमदार सचिनभाऊ चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा १० मार्चपासून शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष व लोकप्रिय आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या ५१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून यंदाही रुग्णालयीन खेळाडूंसाठी क्रिकेट स्पर्धा भरविण्यासाठी आरएमएमएसचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी पुढाकार घेतला आहे.
१० ते २१ मार्च दरम्यान होणाऱ्या आमदार सचिनभाऊ चषक क्रिकेट स्पर्धेमधील पहिल्या आठ विजेत्या-उपविजेत्या संघांना आमदार सचिनभाऊ चषक व वैयक्तिक सन्मान पदकांचा पुरस्कार दिला जाणार आहे. सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटू, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज तसेच प्रत्येक संघातील उत्कृष्ट खेळाडूस विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्पर्धेचा ड्रॉ १ मार्च रोजी दुपारी ४.०० वा. आरएमएमएस सभागृह, परेल येथे जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक लीलाधर चव्हाण यांनी दिली. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या हॉस्पिटल क्रिकेट संघांनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी क्रिकेटपटू चंद्रकांत करंगुटकर अथवा ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल क्रिकेट संघाचे कप्तान प्रदीप क्षीरसागर (७९७७४७१९४३) यांच्याकडे २८ फेब्रुवारीपर्यंत संपर्क साधावा.