
अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना आणि काजोलची मुलगी न्यासा देवगणने 12 फेब्रुवारीला मुंबईतील एका रेस्तराँमध्ये बी-टाउन सेलिब्रिटींसोबत पार्टी केली. मुंबईत झालेल्या या पार्टीत आर्यन खान, पलक तिवारी, अनन्या पांडे, आदित्य रॉय कपूर यांच्यासह अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. याशिवाय न्यासाचा बेस्ट फ्रेंड ओरहान अवत्रामणी देखील पार्टीत सहभागी झाला होता.
पार्टीत दिसला सुहाना, न्यासाचा ग्लॅमरस लूक
रविवारी रात्री झालेल्या पार्टीत सुहानाने व्हाइट वन शोल्डर ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसली. दुसरीकडे आपल्या ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असलेल्या न्यासाने पार्टीत पिंक ड्रेस परिधान केला होता.


रेड चेक शर्टमध्ये दिसला आर्यन खान
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान रेड चेक शर्ट आणि ब्लॅक डेनिममध्ये दिसला. यासह त्याने लेदर जॅकेट कॅरी केले होते. ‘फ्रेडी’ फेम अलाया एफने देखील पार्टीला हजेरी लावली होती, त्या दरम्यान तिने व्हाइट क्रोशेट टॉपसह ब्लॅक पँट घातली होती.


बिजली-बिजली फेम पलक तिवारीने पार्टीसाठी ब्लॅक टॉप आणि मॅचिंग पँटची निवड केली होती. तर न्यासाचा जवळचा मित्र ओरहान शर्ट आणि पायजामामध्ये दिसला. या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे हे देखील पार्टीत झाले सामील
रुमर्ड कपल अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर देखील या पार्टीचा एक भाग होते. या पार्टीत सहभागी होण्यापूर्वी दोघेही सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये दिसले होते. यावेळी दोघेही ब्लॅक आउटफिटमध्ये दिसले.