पठाण चित्रपटाच्या माध्यमातून दणदणीत असे पुनरागमन शाहरुख खान याने केले. विशेष म्हणजे पठाण चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरातून तब्बल 100 कोटींचे बाॅक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.
मुंबई : शाहरुख खान याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पठाण हा चित्रपट 25 जानेवारी रोजी रिलीज झालायं. या चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर धमाकेदार सुरूवात केलीये. आता चित्रपटाला रिलीज होऊन तब्बल तीने आठवडे उलटले आहेत. तीन आठवडे होऊनही चित्रपटाची जोरदार कमाई सुरूच आहे. पठाण चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. 2019 मध्ये शाहरुख खान याचा झिरो हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर (Box office) फ्लाॅप गेला आणि चार वर्ष शाहरुख खान हा मोठ्या पडद्यापासून दूर गेला. शाहरुख खान परत बाॅलिवूड चित्रपटांमध्ये पुनरागमन करणार की नाही? हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता. या दरम्यान शाहरुख खान याचे चाहते त्याच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहात होते. शेवटी तो 25 जानेवारीचा दिवस आला आणि पठाण चित्रपटाच्या माध्यमातून दणदणीत असे पुनरागमन शाहरुख खान याने केले. विशेष म्हणजे पठाण चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरातून तब्बल 100 कोटींचे बाॅक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. अजूनही शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट धमाकेदार कामगिरी करतोय. या चित्रपटाला विदेशातूनही प्रेम मिळाले आहे.
साऊथमध्ये म्हणावा तसा प्रतिसाद हा चित्रपटाला मिळाला नाही. परंतू हिंदी भाषेमध्ये चित्रपटाने कमाई जबरदस्त नक्कीच केलीये. पठाण चित्रपटाला अजून बाहुबली 2 चे रेकाॅर्ड तोडण्यात यश मिळाले नाहीये.
पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. या चित्रपटामधील गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने वाद निर्माण झाला होता.
Witness the rollercoaster ride of action and entertainment as it roars across theatres! #Pathaan Book your tickets – https://t.co/SD17p6x9HI | https://t.co/VkhFng6vBj
Celebrate #Pathaan with #YRF50 only at a big screen near you, in Hindi, Tamil and Telugu. pic.twitter.com/hEE7YJzhKx
— Yash Raj Films (@yrf) February 13, 2023
या वादाचा चित्रपटाला फटका बसेल असे अनेकांना वाटले होते, परंतू या वादाचा प्रत्यक्षात चित्रपटाला फायदा झाला आणि चित्रपटाने सुसाट अशी कामगिरी बाॅक्स ऑफिसवर केलीये.
विशेष म्हणजे रिलीजच्या तिसऱ्या आठवड्यामध्येही चित्रपटाचा जलवा हा बाॅक्स ऑफिसवर बघायला मिळत आहे. यशराज फिल्म्सने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितले की, पठाण चित्रपटाने जगभरातून 946 कोटींची कमाई केलीये.
पठाण चित्रपटाला आता रिलीज होऊन 19 दिवस झाले आहेत. तरीही प्रेक्षकांचे प्रेम पठाण चित्रपटाला मिळताना दिसत आहे. पठाण चित्रपटाने आतापर्यंत अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर नोंदवले आहेत.