नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे, टीटीके प्रेस्टिजची ब्रॅण्ड न्यू उपकरणे व कूकवेअरच्या माध्यमातून, तुमच्या स्वयंपाकघराला नवीन चेहरा देण्याची योग्य वेळ. तुमचा स्वयंपाक झटपट व सोपा करणारी दोन नवीन उत्पादने या ब्रॅण्डने बाजारात आणली आहेत. स्टॅक–ओ–मिक्स मिक्सर ग्राइंडर आणि मल्टी–कूकर ही दोन्ही स्वयंपाकघरात लागणारी उत्पादने अत्यंत चातुर्याने डिझाइन करण्यात आली आहेत. यामधील आधुनिक सुविधांमुळे स्वयंपाक तर सोपा होणारच आहे, शिवाय स्वयंपाकघरात ठेवण्यासाठीही ही उत्पादने अत्यंत सुलभ आहेत. या थाटात आणखी भर घालण्यासाठी टीटीके प्रेस्टिज दोन्ही उत्पादनांवर विशेष स्वागत प्रस्ताव देऊ करत आहे.
स्टॅक–ओ–मिक्स मिक्सर ग्राइंडर
सुविधांनी संपन्न, अत्यंत कार्यक्षम व सोयीच्या दृष्टीने डिझाइन करण्यात आलेल्या स्टॅक–ओ–मिक्स मिक्सर ग्राइंडरमध्ये अनेक नवोन्मेष्कारी फीचर्स आहेत. यामध्ये एक अनन्यसाधारण अशी जार स्टॅकिंग अर्थात जार एकावर एक रचण्याची सुविधा आहे. त्यामुळे हे उत्पादन ठेवण्यासाठी सोपे जाते, स्वयंपाकघरात अत्यंत कमी जागेत मावते. या जार्सना एर्गोनॉमिक हॅण्डल्स आहेत. त्यामुळे ते घट्ट पकडता येतात व हाताळण्यास अधिक सोपे जातात. स्टॅक-ओ-मिक्स मिक्सर ग्राइंडरमध्ये ७५० वॉट्सची शक्तिशाली मोटर आहे. त्यामुळे यात मोठ्या प्रमाणात पदार्थ वाटले जाऊ शकतात. या मिक्सर ग्राइंडरमध्ये पाच समायोजनशील बहुपयोगी ब्लेड्स आहेत. स्वयंपाकघरातील वेगवेगळ्या कामांसाठी ती वापरली जाऊ शकतात. कोरड्या व ओल्या वाटणांसाठी, चटणी वाटण्यासाठी तसेच पदार्थ अगदी बारीक करण्यासाठी आणि घुसळण्यासाठीही वेगवेगळी ब्लेड्स आहेत.
किंमत: ५४४५/- रुपये
विशेष ऑफर: टीटीके प्रेस्टिजच्या स्टॅक–ओ–मिक्स मिक्सर ग्राइंडवर ३० टक्के सवलतीची स्वागत ऑफर
मल्टी–कूकर
एकाच भांड्यात अनेकविध चविष्ट पदार्थ शिजवू शकेल अशा उपकरणाच्या आवश्यकतेतून अत्यंत वैविध्यपूर्ण असा मल्टी-कूकर बाजारात आला आहे. ग्राहक त्यांची कल्पनाशक्ती वापरून यात अनेकविध खाद्यपदार्थ शिजवू शकतात. उकडलेल्या भाज्या, चहा-कॉफी, भात, सुप, रस्सा, पास्ता, नूडल्स आणि आणखी बरेच काही यात शिजवले जाऊ शकते. या स्मार्ट उपकरणात अनेक बुद्धिमान सुविधा आहेत. याचे तोंड रुंद (वाइड माउथ) असल्यामुळे कूकर वापरण्यास व स्वच्छ करण्यास सोपा आहे. याशिवाय सुरक्षिततेसाठी कन्सील्ड एलिमेंट आहे, त्यामुळे उष्णता देणाऱ्या साधनांचे नुकसान टाळले जाते. या कूकरमध्ये तापमान नियंत्रणाची सुविधाही आहे, त्यामुळे त्यात शिजवल्या जाणाऱ्या पदार्थानुसार ग्राहक तापमानात फेरफार करू शकतात. याशिवाय, कूकरच्या शैलीदार काचेच्या झाकणामुळे पदार्थ शिजत असताना त्याकडे पाहणे शक्य होते.
किंमत: २८९५/- रुपये
विशेष ऑफर: टीटीके प्रेस्टिजच्या मल्टी–कूकरवर २० टक्के सवलत देणारी स्वागत ऑफर सध्या उपलब्ध आहे.
उपलब्धता: ग्राहकांना ही उत्पादने प्रेस्टिड एक्स-क्लुजिव लोकेशन्सवरून, निवडक डीलर आउटलेट्समधून तसेच ब्रॅण्डच्या एक्सक्लुजिव ऑनलाइन स्टोअरवरून https://shop.ttkprestige.com/ खरेदी करता येतील.