बँक ऑफ बडोदा द्वारे 31 डिसेंबर 2022 रोजी समाप्त झालेल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले
ठळक वैशिष्ट्ये
|
*एकूण उलाढाल म्हणजे एकूण ठेवी व एकूण ॲडव्हान्सेसची बेरीज
व्यावसायिक कामगिरी
- बँकेचे जागतिक अग्रिम वर्षानुवर्षे +19.7% वृद्धि सोबत रु.9,23,878 कोटी इतके झाले आहेत.
- बँकेचे स्थानिक अग्रिम वर्षानुवर्षे +16.2% वाढून रु.7,60,249 कोटी इतके झाले आहेत.
- आंतराष्ट्रीय अग्रिममध्ये FY23 च्या तीसरी तिमाही मध्ये FY23 च्या दूसरी तिमाही च्या तुलनेत 8.6% होते ते 4.4% वृद्धि सोबत रु.1,63,629 कोटी इतके आहे.
- जागतिक पातळीवरील ठेवींमध्ये वार्षिक 17.5% वाढ होऊन ही रक्कम रु.11,49,507 कोटी इतकी झाली आहे.
- डिसेंबर 22 मध्ये स्थानिक पातळीवरील ठेवींमध्ये वार्षिक 14.5% वाढ होऊन ही रक्कम 10,03,737 कोटी इतकी झाली आहे.
- डिसेंबर 22 मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील ठेवींमध्ये वार्षिक 43.6% वाढ होऊन ही रक्कम 1,45,770 कोटी इतकी आहे.
- डिसेंबर 22 मध्ये स्थानिक CASA मध्ये वार्षिक 7.6% वाढ नोंदविली आहे आणि ती रक्कम रु.4,17,812 कोटी असून स्थानिक बचत खात्यातील ठेवींमध्ये वार्षिक 9.2% वाढ नोंदवली आहे.
- ऑरगॅनिक रिटेल ॲडव्हान्सेसमध्ये 29.4% वाढ झाली आहे, वर्षानुवर्षे आधारावर मोटार कर्ज (27.5%), गृह कर्ज (19.6%), वैयक्तिक कर्ज (169.6%), तारण कर्ज (20.5%), शैक्षणिक कर्ज (24.1%) या उच्च केंद्रीत विभागांनी या वाढीला चालना दिली आहे.
- कृषी लोन पोर्टफोलियोमध्ये वार्षिक 12.8% वाढ झाली असून त्याची रक्कम रु.1,19,197 कोटी इतकी आहे.
- एकूण सुवर्ण कर्ज पोर्टफोलियो (रिटेल व कृषी समाविष्ट करून) रु.35,134 कोटी इतका आहे, जी वार्षिक 29.8% वाढ आहे.
- ऑरगॅनिक एमएसएमई पोर्टपोलियोमध्ये वार्षिक 11.1% वाढ होऊन तो रु.1,03,003 कोटी इतका झाला आहे.
लाभप्रदता
- वित्तीय वर्ष 2023 च्या तिसरी तिमाही मध्ये निव्वळ व्याज उत्पन्नात वार्षिक 26.5% होऊन 10,818 कोटी इतके नोंदविण्यात आले आहे. वित्तीय वर्ष च्या नौमाही मध्ये वर्षानुवर्षे 24.2% वाढ नोंदविण्यात आली असू ते रु.29,831 कोटी इतके आहे.
- तिमाहीमध्ये शुल्काधारित महसूलात 9.4% वाढ होऊन ते रु. 1,539 कोटी इतके नोंदविण्यात आले आहे. वित्तीय वर्ष 2023 च्या नौमाही मध्ये ते रु.4,332 कोटी इतके नोंदविली असून ही वार्षिक 12.2% वाढ आहे.
- वित्तीय वर्ष च्या तिसरी तिमाही चे परिचालन उत्पन्न रु.14,370 कोटी इतके असून ही वर्षानुवर्षे 29.8% इतकी वाढ आहे.
- अग्रिम वरील उत्पन्नात वित्तीय वर्ष 23 च्या तिसरी तिमाही मध्ये 7.78% वाढ झाली जी वित्तीय वर्ष 22 च्या तीसरी तिमाही मध्ये 6.92% इतकी होती.
- जमा वरील खर्च वित्तीय वर्ष 23 च्या तीसरी तिमाही मध्ये 4.01% आहे जो वित्तीय वर्ष 22 च्या तीसरी तिमाही मध्ये 3.50% इतका होता.
- खर्च व उत्पन्न यांचे प्रमाण वित्तीय वर्ष 23 मध्ये कमी होऊन ते 42.71% झाले जे Q3FY22 मध्ये 50.47% होते.
- वित्तीय वर्ष 23 च्या द्वितीय तिमाही मध्ये ऑपरेटिंग नफा रु.8,232 कोटी इतका नोंदविला, जी वार्षिक 50.1% इतकी वाढ आहे. वित्तीय वर्ष 23 नौमाही चा ऑपरेटिंग नफा रु.18,791 कोटी इतका नोंदविण्यात आला आहे जी वर्षानुवर्षे 12.2% वाढ आहे.
- बँकेने वित्तीय वर्ष 23 च्या तीसरी तिमाही मध्ये रु.3,853 कोटी इतका स्वतंत्र निव्वळ नफा नोंदविला जो वित्तीय वर्ष 22 च्या तीसरी तिमाही मध्ये रु.2,197 कोटी इतका होता.
- वित्तीय वर्ष 23 च्या तीसरी तिमाही मध्ये जागतिक पातळीवरील एनआयएममध्ये 3.37% वाढ झाली जी वर्षानुवर्षे 24 बीपीएसची वाढ आहे. वित्तीय वर्ष 23 च्या नौमाही साठी एनएआयएम 3.23% आहे जो वित्तीय वर्ष 22 च्या नौमाही साठी 3.01% होता.
- वित्तीय वर्ष 23 च्या तीसरी तिमाही मत्तांवरील परताव्यात (वार्षिक) वित्तीय वर्ष 23 च्या दूसरी तिमाही मध्ये वाढ होऊन तो 1.13% झाला जो वित्तीय वर्ष 22 तीसरी तिमाही मध्ये 0.74% होता. वित्तीय वर्ष 23 च्या नौमाही साठी मत्तांवरील परतावा 0.93% नोंदविण्यात आला.
- इक्विटीवरील परतावा (वार्षिक) वित्तीय वर्ष 23 च्या नौमाही मध्ये वर्षानुवर्षे 504 बीपीएस वाढून तो 17.02% इतका झाला.
- एकत्रित एंटिटीचा विचार करता Q3 वित्तीय वर्ष 23 तीसरी तिमाही मध्ये निव्वळ नफा रु.4,306 कोटी इतका नोंदविला जो वित्तीय वर्ष 22 च्या तीसरी तिमाही मध्ये 2,464 कोटी नोंदविला होता.
अॅसेट क्वालिटी
- बँकेचा एकूण एनपीए वित्तीय वर्ष 23 च्या तीसरी तिमाही मध्ये वर्षानुवर्षे 25.3% कमी होऊन तो रु.41,858 कोटी इतका झाला आणि एकूण एनपीओ रेश्योत वित्तीय वर्ष 23 च्या तीसरी तिमाही मध्ये सुधारणा होऊन तो 4.53% झाला जो वर्ष 22 च्या तीसरी तिमाही 7.25% होता.
- वित्तीय वर्ष 23 च्या तीसरी तिमाही मध्ये बँकेचा निव्वळ एनपीए रेश्यो सुधारून तो 0.99% झाला जो वर्ष 22 च्या तीसरी तिमाही मध्ये 2.25% होता.
- बँकेचा प्रोव्हिजन कव्हरेज रेश्यो वित्तीय वर्ष 23 च्या तीसरी तिमाही मध्ये TWO सह 92.34% होता तर TWO वगळून तो 78.85% इतका होता.
- वित्तीय वर्ष 23 च्या तीसरी तिमाही मध्ये स्लिपेज रेश्योमध्ये घट होऊन तो 1.05% झाला जो वर्ष 22 च्या तीसरी तिमाही मध्ये 1.68% होता. वित्तीय वर्ष 23 च्या तीसरी तिमाही मध्ये स्लिपेज रेश्योमध्ये 72 बीपीएसची सुधारणा होते आणि तो 1.22% झाला आहे.
- वित्तीय वर्ष 23 च्या तीसरी तिमाही साठी क्रेडिट कॉस्ट 0.37% होती.
भांडवल पर्याप्तता
- डिसेंबर 22 मध्ये बँकेचा सीआरएआर 14.93% होता. डिसेंबर 22मध्ये श्रेणी-I 12.62% इतका होता (सीईटी –1 10.83%, एटी1 1.79%) आणि श्रेणी-II 2.31% होता.
- एकत्रित एंटिटीचा सीआरएआर आणि सीईटी-1 अनुक्रमे 15.44% आणि 11.45% आहे.