मुंबई, ६ फेब्रुवारी २०२३: ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज भारतात ऑल-न्यू ऑडी क्यू३ स्पोर्टबॅकसाठी बुकिंग्जना सुरूवात केली. नवीन ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक व्यावहारिक, स्पोर्टी व आकर्षक आहे. प्रमाणित म्हणून क्वॉट्रो ऑल-व्हील ड्राइव्हसह सुसज्ज ऑडी क्यू३ स्पोर्टबॅकमध्ये २.० लिटर टीएफएसआय पेट्रोल इंजिनची शक्ती आहे. हे इंजिन १९० एचपी शक्ती आणि ३२० एनएम टॉर्कची निर्मिती करते. नवीन ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक २ लाख रूपयांच्या सुरूवातीच्या रक्कमेमध्ये बुक करता येऊ शकते.
ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीर सिंग धिल्लों म्हणाले, ‘‘२०२३ साठी आमचे पहिले लाँच बॅज असेल, जे भारतात आमचे बेस्ट-सेलर राहिले आहे. आज, आम्हाला फर्स्ट-इन-द-सेगमेंट असलेली बॉडी टाइप-ऑल-न्यू ऑडी क्यू३ स्पोर्टबॅकसाठी बुकिंग्जचा शुभारंभ करण्याचा आनंद होत आहे. ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक कार्यक्षमता व अधिक उच्च दर्जाची डिझाइन असलेली दैनंदिन वापराकरिता कारचा शोध घेत असलेल्या ग्राहकांना आवडेल.’’
श्री. धिल्लों पुढे म्हणाले, ‘‘आम्हाला २०२२ मध्ये २७ टक्के वाढ दिसण्यात आली आणि विश्वास आहे की २०२३ मध्ये देखील काही वेगळे नसणार. ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक सारख्या उत्पादनांसह आम्ही यावर्षी दोन-अंकी वाढीची अपेक्षा करत आहोत.’’
नवीन ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक टर्बो ब्ल्यू, ग्लेशियर व्हाइट, क्रोनोस ग्रे, मिथोस ब्लॅक आणि नवेरा ब्ल्यू. उपलब्ध इंटीरिअर रंग पर्याय आहेत – ओकापी ब्राऊन आणि पर्ल बिज या पाच आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल. ऑडी इंडिया वेबसाइट (www.audi.in) आणि ‘मायऑडी कनेक्ट’ अॅपच्या माध्यमातून ऑनलाइन बुकिंग्ज करता येईल.
ही विभागातील पहिली कॉम्पॅक्ट कूपे क्रॉसओव्हर आहे. या कारच्या एक्स्टीरिअर वैशिष्ट्यांमध्ये एलईडी हेडलाइट्ससह एलईडी रिअर कॉम्बीनेशन लॅम्प्स, पॅनोरॅमिक ग्लास सनरूफ, कम्फर्ट की सह गेस्चर-कंट्रोल्ड टेलगेट, ५ स्पोक व्ही स्टाइल ‘एस डिझाइन’ आर१८ अलॉई व्हील्स आणि हाय ग्लॉस स्टायलिंग पॅकेज आदींचा समावेश आहे. तसेच इंटीरिअर वैशिष्ट्यांमध्ये ऑडी व्हर्च्युअल कॉकपीट प्लस, एमएमआय नेव्हिगेशन प्लस सह एमएमआय टच, ऑडी ड्राइव्ह सिलेक्ट, ऑडी फोन बॉक्स सह वायरलेस चार्जिंग, २-झोन क्लायमेट कंट्रोल, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल फ्रण्ट सीट्ससह फोर-वे लंबर सपोर्ट, अॅम्बियण्ट लायटिंग पॅकेज प्लस आणि ऑडी साऊंड सिस्टम देण्यात आले आहे.