औरंगाबाद, नागपूर, कोकण शिक्षक मतदार संघ आणि नाशिक तसेच अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. या पाचही मतदार संघात कुणाचा गुलाल उधळला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोकण शिक्षक मतदार संघाचा निकाल हाती लागला आहे. यात भाजपने विधानपरिषद निवडणुकीत पहिला विजय मिळवला आहे. भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे हे विजयी झाले आहेत. ज्ञानेश्वर म्हात्रे यांना 20 हजार 800 मते मिळाली आहेत. पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पूर्ण केला आहे. त्यामुळे आपला विजय झाल्याची घोषणा ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केली आहे.
…तर हा धक्का- जयंत पाटील
कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले आहेत. पहिल्याच फेरीत भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी निर्णायक आघाडी घेतली होती. दरम्यान, आम्ही बाळाराम पाटील यांच्यासाठी प्रयत्न करत होतो. मात्र, असा काही निकाल लागला असेल तर तो धक्का आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.