मुंबई, २० जानेवारी २०२३: सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ अभियानामध्ये पुढचे पाऊल उचलत, देशाचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई मेट्रो लाईन २ए आणि ७ च्या द्वितीय टप्प्याचा शुभारंभ करण्यात आला. या प्रकल्पासाठी बाहेरचे पॅनल, कार बॉडी, स्ट्रक्चर, रूफ, अंतर्गत वस्था, अंडरफ्रेम आणि स्टेनलेस स्टीलच्या इतर ऍप्लिकेशन्ससाठी स्टेनलेस स्टील जिंदल स्टेनलेसने पुरवले आहे. आज मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका समर्पण समारंभामध्ये माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. ही मेट्रो लाईन जनतेसाठी आजपासून सुरु केली जाईल.
या मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी जिंदल स्टेनलेसने विविध टेम्पर आणि २जे फिनिश असलेल्या, ३०१एलएन श्रेणीच्या उच्च दर्जाच्या स्टेनलेस स्टीलचा पुरवठा केला आहे. जानेवारी २०२१मध्ये सुरु करण्यात आलेला हा स्टेनलेस स्टीलचा पुरवठा डिसेंबर २०२५ पर्यंत सुरु राहील. या प्रकल्पासाठी जिंदल स्टेनलेस देशातील विविध राज्यांमध्ये असलेल्या आपल्या वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्समधून स्टेनलेस स्टील उपलब्ध करवून घेत आहे.
या ट्रेन सेटची निर्मिती भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (बीईएमएल) अनेक बॅचेसमध्ये करत आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या एकूण ५७६ कोचेसपैकी १४४ कोचचा पुरवठा आजतागायत करण्यात आला आहे. २ए मेट्रो लाईनची १८.६ किमी आणि मेट्रो लाईन ७ ची १६.५ किमी लाईन तयार करण्यासाठी जवळपास ५,७६० मेट्रिक टन स्टेनलेस स्टील वापरले जाईल.