ITCने केलेल्या सर्वेक्षणानुसार,
- सहभागी लहान असताना आईला जेवढ्या वेळा मिठी मारत असत त्या तुलनेने आता ५०% वेळा मिठी मारतात
- ६०% सहभागींच्या मते आई हा त्यांच्या आनंदाचा सर्वात मोठा स्रोत आहे.
जानेवारी २०२३ : आजच्या वेगवान जगात अनेक कारणांमुळे मानसिक ताणाची पातळी वाढत आहे. त्यावर मात करण्यासाठी व ताण घालविण्यासाठी आपण ऑनलाइन कंटेन्ट पाहणे, गेमिंग, सोशल मीडियावर वेळ घालवणे यांसारख्या उपायांचा अवलंब करतात. या उलट, कामाला व इतर सामाजिक दायित्वांना प्राधान्य दिल्यामुळे आपल्या आई-वडिलांसोबत वेळ घालवणे आणि त्यांच्याशी असलेली शारीरिक जवळीक कमी होत चालली आहे. पण अलीकडे ITC Sunfeast Mom’s Magic ने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले की, यात सहभागी व्यक्तींसाठी आईला मिठी मारणे हा ताण हलका करणारा सर्वाधिक प्रभावी आणि त्यांना आनंद देणारा उपाय आहे.
या संदेशाचा प्रसार करण्यासाठी Sunfeast Mom’s Magic ने नव्या वर्षाच्या औचित्याने #HugHerMore हे राष्ट्रीय पातळीवरील कॅम्पेन सुरू केले. प्रत्येकाने आपल्या आईला जास्त वेळा मिठी मारण्यास प्रोत्साहन देणे हा या कॅम्पेनचा हेतू होता.
Sunfeast Mom’s Magic ने दिल्ली, बंगळुरू आणि मुंबईतील ३२१ जणांचे सर्वेक्षण केले. कालानुक्रमे आईला मिठी मारण्यामध्ये कशा प्रकारे बदल होत गेला आहे हे जाणून घेणे हा क्रोनिटच्या सहयोगाने करण्यात आलेल्या या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट होते.
सहभागींच्या सर्वेक्षणातून समोर आलेले ठळक मुद्दे:
- जेन झेडमधील व्यक्ती लहान असताना आईला जेवढ्या वेळा मिठी मारत असत ते प्रमाण आता ३१% कमी झाले आहे आणि मिलेनिअल्समध्ये हे प्रमाण ३३% कमी झाले आहे. वर्किंग प्रोफेशनल्सच्या तुलनेने विद्यार्थी आपल्या आईला जास्त वेळा मिठी मारतात.
- संगीत ऐकणे हा मनावरील ताण हलका करण्यासाठी सर्वाधिक प्रमाणात अवलंबण्यात येणारा उपाय आहे. त्या खालोखाल ओटीटीवर कंटेन्ट पाहण्याचा क्रमांक लागतो. आईला मिठी मारण्याचा क्रमांक तिसरा आहे.
- आपल्या मुलांना आठवड्यातून ६ वेळा मिठी मारतात, जोडीदाराला आठवड्यातून पाच वेळा तर आईला आठवड्यातून ३ वेळा मिठी मारली जाते.
- आईला मिठी मारल्यावर कसे वाटते, हे विचारल्यावर सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ६०% हून अधिक व्यक्ती म्हणाल्या की, त्यांना दिलासा मिळतो, मन प्रफुल्लित होते आणि ते आनंदी होतात.
या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या व्यक्ती १३ ते ३५ या वयोगटातील होत्या आणि पुरुष व स्त्री अशा दोन्हींचा समावेश होता. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या व्यक्तींचे नंतर विद्यार्थी, वर्किंग प्रोफेशनल्स, गृहिणी आणि आईवडिलांसमवेत राहणारे तरुण व वेगळे राहणारे तरुण असे वर्गीकरण करण्यात आले होते.
सर्वेक्षण व सामाजिक प्रयोग कॅम्पेनची माहिती देताना ITC Ltd.च्या फुड डिव्हिजनच्या बिस्किट्स अँड केक्स क्लस्टर विभागाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री. अली हॅरिस शेरे म्हणाले, “मिठी मारणे ही प्रेमाची अभिव्यक्ती आहे आणि आई व तिच्या मुलांमधील नाते घट्ट करण्यासाठी महत्त्वाचे आहे. आपण जसजसे मोठे होत जातो आणि दैनंदिन कामांमध्ये व्यस्त होत जातो तेव्हा आपल्या आईसोबत असणारी शारीरिक जवळीक कमी होत जाते. हे अंतर वाढत जाते आणि त्यामुळे मुले स्वतंत्र झाल्यावर आईचा एकटेपणा वाढत जातो. सामाजिक दायित्वांप्रती अनेक उपक्रम राबविणारा ब्रँड म्हणून आम्ही पाठिंब्यासाठी हाक देत आहोत आणि आईशी संबंधित दैनंदिन समस्यांची खुली चर्चा करत आहोत. आई ही मायेची उब देणारी सुपरपॉवर आहे हा संदेश देणे हा आमचा हेतू आहे. या नवीन वर्षाच्या औचित्याने तमाम आईंच्या वतीने आम्हाला सर्व मुलांना संदेश द्यायचा होता की, आईला मिठी मारणे हे अत्यंत दिलासा देणारे आणि जादुई असते. प्रत्येकाने आपल्या आईला जास्त वेळा मिठी मारावी हे आमच्या #HugHerMore या कॅम्पेनचे उद्दिष्ट आहे. किंबहुना, आमच्या सामाजिक प्रयोगातून दिसून आले की, आईला मिठी मारल्याने सहभागी अधिक आनंदी झाला होता. आपण लहान असताना आईला जितक्या वेळा मिठी मारत होतो, तेवढ्या वेळा आतासुद्धा मिठी मारली पाहिजे, असा संकल्प आपण नवीन वर्षाच्या निमित्ताने केला पाहिजे.”
सामाजिक प्रयोगचा तपशील:
एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या आईला मिठी मारते तेव्हा तिच्या आनंदाची पातळी किती असते हे जाणून घेण्यासाठी ITC Sunfeast Mom’s Magic ने द हॅपीनेस हॅक एक्स्पेरिमेंट नावाचा सामाजिक प्रयोग केला. जेव्हा व्यक्ती आपल्या आईला मिठी मारते तेव्हा त्या व्यक्तीच्या आनंदाच्या भावनेत काय परिणाम होतात, हे जाणून घेण्यासाठी मेंदूला ट्रॅकिंग उपकरण जोडण्यात आले होते.
हा दोन दिवसीय प्रयोग दाखविण्यासाठी डिजिटल व्हिडियो तयार करण्यात आला. यात सहभागी व्यक्ती अनेक प्रकारच्या ॲक्टिव्हिटी करत होती : सोशल मीडियावर पोस्ट टाकणे, सोशल मीडिया कंटेन्ट पाहणे, चॅट ॲपवर मित्र-मैत्रिणींसमवेत चॅट करणे आणि आपल्या आईला मिठी मारणे. दुसऱ्या दिवशी जेव्हा सहभागीने आईला मिठी मारली तेव्हा आनंदी भावनेच्या पातळीमध्ये सर्वाधिक वाढ झाल्याचे दिसून आले. आईला मारलेली मिठी ही जादुई असते हाच निष्कर्ष यातून निघतो. प्रत्येक भारतीयाने आपल्या आईला मिठी मारावी आणि तिच्यासोबत अधिक वेळ घालविण्याचे संकल्प करण्याचे आवाहन #HugHerMore कॅम्पेनच्या माध्यमातून ITC Sunfeast Mom’s Magic करत आहे.
सामाजिक प्रयोगाबद्दल चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर, ओगिल्व्ही साउथ, पुनीत कपूर म्हणतात, “आपल्या व्यस्त व दगदगीच्या जीवनशैलीपासून दिलासा मिळविण्यासाठी आनंदी होण्याच्या विविध मार्गांच्या आपण कायम शोधात असतो. यासाठी, आपण बहुधा तंत्रज्ञान किंवा स्क्रीनचा सहारा घेतो. तंत्रज्ञानामुळे आपला आनंद तात्पुरता वाढू शकतो, पण खरा आनंद हा भासमान आहे, असेच वाटत राहते. आपल्या स्क्रीन टाइममध्ये प्रचंड वाढ होत असताना माणसाशी असलेली नाती दृढ करण्याची वेळ आली आहे. आता खरे तर आनंदाच्या सर्वोत्तम स्रोताकडे आपण वळण्याची गरज आहे. तो स्रोत म्हणजे – आपली आई. या प्रयोगात तंत्रज्ञानाला प्राधान्य दिले होते, आईला मिठी मारणे हा एक किमान आमिष देणारा पर्याय होता. पण सामाजिक प्रयोगातून सहभागीवर आईच्या मिठीचा जादुई परिणाम दिसून आला.”