नवी दिल्ली, १९ जानेवारी २०२३: भारतातील सर्वात मोठी खाजगी तेल आणि वायू उत्खनन आणि उत्पादन कंपनी वेदांताच्या केर्न ऑइल अँड गॅसने निक वॉकर यांची ५ जानेवारी २०२३ पासून मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
या नियुक्तीपूर्वी श्री. वॉकर हे आघाडीच्या युरोपियन स्वतंत्र ई अँड पी कंपन्यांपैकी एक असलेल्या लुंडिन एनर्जीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते. यापूर्वी बीपी, तलीस्मान एनर्जी आणि आफ्रिका ऑईल या सारख्या कंपन्यांमध्ये काम केलेल्या निक यांना तांत्रिक, व्यावसायिक आणि कार्यकारी नेतृत्व भूमिकांमध्ये ३० हून अधिक वर्षांचा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आंतरराष्ट्रीय अनुभव आहे.
नियुक्तीची घोषणा करताना, वेदांत रिसोर्सेस लिमिटेडचे अध्यक्ष श्री.अनिल अगरवाल म्हणाले, “आम्ही वेदांताच्या केर्न ऑइल अँड गॅस व्यवसायासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निक यांचे स्वागत करत असून आगामी वर्षांमध्ये कंपनीच्या वाढीला चालना देण्यासाठी उत्सुक आहोत. केर्न विकास आणि शाश्वततेच्या पुढील टप्प्यावर जात असल्यामुळे निक यांचा ऊर्जा क्षेत्रातील जागतिक अनुभव आणि अविश्वसनीय ट्रॅक रेकॉर्ड योग्य कौशल्य प्रदान करेल.”