विद्याविहार येथील सोमय्या महाविद्यालयात देशभरातील आठ निवडक कलाकारांच्या चित्रांचे प्रदर्शन करवण्यात आले आहे. व्हेयस ऑफ अवर लाईफ असे या प्रदर्शनाचे घोषवाक्य आहे. सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटीतील अरबिंदो सभागृहात ६ जानेवारी रोजी प्रदर्शनाचे उद्धघाटन करण्यात आले. देशभरातील कलाकार या प्रदर्शनात सहभागी झालेले असल्यामुळे त्यांच्या वास्तव्याची व्यवस्था सोमय्या महाविद्यालयाच्यावतीने करण्यात आली होती. त्या निमित्ताने या कलाकारांना मुंबईची संस्कृती जाणून घेण्याची संधी देण्यात आली. सत्यम यादव यांनी या प्रदर्शनासाढी पुढाकार घेतला होता. यंग आर्टचे सह संस्थापक अल कवी नानावटी, कार्प आर्टच्या संस्थापिका नताशा जयसिंग, व्यावसायिक क्युरेटर शालिन वाधवान, सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटीचे सिद्धार्थ सोमय्या यांच्या संकल्पनेतून प्रदर्शन करविण्यात आले. २२ जानेवारी रोजी प्रदर्शनचा अखेरचा दिवस असेल अनिश नंदी, भाविन पटेल, ग्रीष्मा शर्मा, बिस्वजीत ठाकुरिया, मौमिता बसाक, शिव शंकर, सृष्टी गुप्ता, धमशांगका माकू या आठ कलाकारांच्या कलाकृती या निमित्ताने मुंबईकरांना पाहता येतील.