· डिलिव्हरी एग्झिक्युटिव्ह्ज पार्टनर APP वरील एसओएस बटन दाबून किंवा एका टोल-फ्री क्रमांकामार्फत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून घेऊ शकतात
· सध्याचा सरासरी प्रतिसाद कालावधी १२ मिनिटे एवढा आहे
मुंबई , जानेवारी १६, २०२२: स्विगी ह्या भारतातील आघाडीच्या ऑन-डिमांड कन्विनियन्स प्लॅटफॉर्मने आपले सर्व सक्रिय डिलिव्हरी एग्झिक्युटिव्ह्ज व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांना, आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी, तत्काळ व मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. उद्योगक्षेत्रातील अशा प्रकारच्या या पहिल्याच उपक्रमासाठी स्विगीने डायलफोरटूफोरटू अॅम्ब्युलन्स सर्व्हिसेस या कंपनीशी भागीदारी केली आहे. डिलिव्हरी एग्झिक्युटिव्ह्ज १८०० २६७ ४२४२ या टोल-फ्री क्रमांकावर रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधू शकतात. काहीवेळा फोनद्वारे संपर्क साधणे शक्य नसते. अशा वेळी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास एग्झिक्युटिव्ह्ज पार्टनर अॅप बंद न करता, डिलिव्हरीपूर्वी, डिलिव्हरीदरम्यान किंवा डिलिव्हरीनंतर, एसओएस बटन दाबू शकतात.
या प्रक्रियेसाठी कोणतीही कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही; डिलिव्हरी एग्झिक्युटिव्हने केवळ त्याच्या/तिच्या पार्टनर आयडीची पुष्टी करणे पुरेसे आहे.
बेंगळुरू, दिल्ली राजधानी परिसर, हैदराबाद, मुंबई, पुणे आणि कोलकाता ह्या शहरांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा राबवल्यानंतर, स्विगीने, आता देशभरात ही सेवा सुरू केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा राबवली जात असताना आत्तापर्यंत जेवढ्या वेळा रुग्णवाहिकेची मागणी झाली, त्यात सेवा प्रतिसाद कालावधी सरासरी १२ मिनिटे होता. डायलफोरटूफोरटू, मागणीच्या गांभीर्यानुसार, वेगवेगळ्या प्रकारच्या रुग्णवाहिका पाठवू शकते. यांमध्ये बीएलएस (बेसिक लाइफ सपोर्ट) रुग्णवाहिका, कार्डिअॅक रुग्णवाहिका, एएलएस (अॅडव्हान्स्ड लाइफ सपोर्ट), आंतरराज्य रुग्णवाहिका, कोविड-१९ रुग्णवाहिका व शववाहिकांचाही समावेश होतो.
सर्व सक्रिय डिलिव्हरी एकग्झिक्युटिव्ह्ज आणि स्विगीने दिलेल्या विमा संरक्षणामध्ये येणाऱ्या, त्यांच्यावर अवलंबून नातेवाइकांसाठी (जोडीदार व दोन मुले) ही सेवा मोफत आहे. विमा संरक्षणाखाली न येणाऱ्या कुटुंबियांसाठीही डिलिव्हरी एग्झिक्युटिव्ह्ज ही सेवा सवलतीतील दरामध्ये घेऊ शकतात.
स्विगीमधील ऑपरेशन्स विभागाचे प्रमुख मिहिर राजेश शहा म्हणाले, “आपल्या डिलिव्हरी एग्झिक्युटिव्ह्जच्या सुरक्षिततेप्रती स्विगी बांधील आहे आणि गेल्या काही वर्षांत आम्ही त्यांच्या सुरक्षिततेला व कल्याणाला प्राधान्य देणाऱ्या उत्पादन व धोरणांमध्ये गुंतवणूक करत आहोत. आमचे डिलिव्हरी एग्झिक्युटिव्ह्ज दररोज लाखो डिलिव्हरीज सुरळीतपणे पार पाडतात. मात्र, आपत्कालीन परिस्थिती आकस्मिकपणेच निर्माण होते. मागणीनुसार मोफत रुग्णवाहिका सेवा देऊन स्विगी एग्झिक्युटिव्ह्जच्या पाठीशी उभी राहत आहे. यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची व मन:शांतीची काळजी घेतली जाईल आणि त्यांना मदतीची सर्वाधिक गरज असेल, तेव्हा ती पुरवली जाईल.”
एखाद्या प्लॅटफॉर्मद्वारे राबवल्या जाणाऱ्या उद्योगक्षेत्रातील या अशा प्रकारच्या पहिल्याच उपक्रमाबद्दल डायलफोरटूफोरटूचे सहसंस्थापक जीतेंद्र लालवानी म्हणाले, “दररोज शेकडो डिलिव्हरी एग्झिक्युटिव्ह्जना रस्त्यांवरून जाताना-येताना बघण्याची आपल्याला आता सवय झाली आहे. मात्र, ९११सारखी खात्रीशीर आपत्कालीन सहाय्य यंत्रणा नसलेल्या देशांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत आपला महत्त्वाचा वेळ वाया जातो. स्विगीने आपल्या डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या ताफ्यासाठी या समस्येवर सक्रियपणे उपाय शोधला आणि डायलफोरटूफोरटूशी भागीदारी केली याचा आम्हाला आनंद वाटतो. आमच्याकडे भारतातील ५००हून अधिक शहरांमध्ये १००००हून अधिक रुग्णवाहिका आहेत. विविध क्षमतांच्या तसेच रुग्णापर्यंत अवघ्या काही मिनिटांत पोहोचून सहाय्य पुरवू शकणाऱ्या रुग्णवाहिकांमुळे अमूल्य जीवन वाचवणे शक्य होते. डायलफोरटूफोरटूद्वारे नजीकचे कॅशलेस रुग्णालयही शोधले जाते. त्यामुळे स्विगीच्या एग्झिक्युटिव्ह्जना वेळेत उपचार मिळतील याची खात्री होते. याशिवाय डायफोरटूफोरटू रुग्णवाहिका उपचार सुरू होईपर्यंत रुग्णालयातच थांबतात. या उपक्रमामुळे अन्य प्लॅटफॉर्म्ससाठीही एक पायंडा घातला जावा अशी आशा आम्हाला वाटते.”
रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून घेतलेले पुण्यातील डिलिव्हरी एग्झिक्युटिव्ह अन्वरपाशा सय्यद म्हणाले, “मी स्विगीच्या हॉटलाइन टीमशी संपर्क केला आणि माझा अपघात झाला होता त्या ठिकाणी १५ मिनिटांच्या आत रुग्णवाहिका पोहोचली. मी सुचवलेल्या रुग्णालयात रुग्णवाहिका कर्मचारी मला घेऊन गेले. माझ्या शरीरावर काही ठिकाणी गंभीर स्वरूपाचे ओरखडे आले होते. त्यासाठी मला वेळेत उपचार मिळाले. ही स्विगीची उत्तम सेवा आहे आणि मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना व मित्रांना याविषयी माहिती देईन”
गुरूग्रामचे आणखी एक डिलिव्हरी एग्झिक्युटिव्ह संजीव कुमार यांनी त्यांचा अनुभव सांगितला. ते म्हणाले, “मी थेट टोल-फ्री क्रमांकावर संपर्क केला आणि १० मिनिटांच्या आत रुग्णवाहिका पोहोचली. या तत्पर व मोफत आपत्कालीन सेवेद्वारे आम्हाला केलेल्या मदतीबद्दल मी स्विगीचा ऋणी आहे.”
२०२१ मध्ये स्विगीने आपत्कालीन सहाय्य सेवा (इमर्जन्सी सपोर्ट सर्व्हिसेस अर्थात ईएसएस) सुरू केली. या सेवेचा भाग म्हणून पार्टनर अॅपवर एसओएस बटन देण्यात आले. हे बटन दाबून पार्टनर कोठेही बोलण्याची गरज न भासता थेट स्विगी हॉटलाइन, रुग्णवाहिका किंवा पोलिस यांच्याशी जोडला जातो. सर्व डिलिव्हरी एग्झिक्युटिव्ह्जना ओळखपत्रे देण्यात आली. त्यावर आपत्कालीन संपर्क व रक्तगटासारखे तपशील समाविष्ट करण्यात आले.
ही सेवा सुरू करून स्विगीने एक सक्रिय आपत्कालीन सेवा यंत्रणा प्रस्थापित केली आहे. त्यामुळे काही दुर्दैवी घटना झाल्यास, डिलिव्हरी एग्झिक्युटिव्ह्जना लवकरात लवकर मदत मिळू शकेल. स्विगीच्या प्लॅटफॉर्मवर सध्या देशभरात ३ लाखांहून अधिक डिलिव्हरी पार्टनर्स आहेत. त्यांना अपघात विमा आणि वैद्यकीय संरक्षण, व्यक्तिगत कर्ज, कायदेशीर सहाय्य, कोविड उत्पन्न सहाय्य, अपघात किंवा आजाराच्या काळात उत्पन्न सहाय्य, शोकासाठी (जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास) सुट्या, नियमित सुट्या (पीरियड टाइम-ऑफ) आणि मातृत्व संरक्षण आदी सुविधा दिल्या जातात.