अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने आज आपल्या आगामी ओरिजिनल सीरिज ‘फर्जी’चा ट्रेलर प्रदर्शित केला. तसेच, या क्राईम ड्रामा सिरीजद्वारे सुपरस्टार शाहिद कपूर आणि विजय सेतुपती ओटीटी विश्वात पदार्पण करणार आहेत. मालिकेत के के मेनन, राशी खन्ना, अमोल पालेकर, रेजिना कॅसांड्रा आणि भुवन अरोरा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत आणि 10 फेब्रुवारीपासून भारतात आणि 240 देश आणि प्रदेशांमध्ये प्रसारित होईल.
ट्रेलरमध्ये आपल्याला अल्पावधीमध्येच ठग बनणाऱ्या सनी (शाहिद)च्या आयुष्याची झलक पाहायला मिळते. एक तेजतरार आणि अपरंपरागत टास्क फोर्स ऑफिसर (विजय) यांनी देशाला त्याच्याकडून असलेल्या धोक्यापासून मुक्त करणे हे आपले ध्येय बनवले आहे. आठ भागांची असलेली ‘फर्जी’ही अनोखी क्राईम थ्रिलर सिरीज, तीव्र आणि चपखल आहे. तसेच, शोमध्ये दिग्दर्शक जोडीचा ट्रेडमार्क ह्युमर पाहायला मिळणार आहे. यामध्ये श्रीमंतांची बाजू घेणार्या व्यवस्थेला रोखण्यासाठी एका हुशार अंडरडॉग स्ट्रीट आर्टिस्टने केलेला प्रयत्न पाहायला मिळेल.
ट्रेलर लाँचच्या दिवशी या मालिकेबद्दल बोलताना शाहिद कपूर म्हणाला, “ही Amazon Original Series, Farzi माझ्या हृदयात एक खास कोपरा आहे. कहने को तो हा माझा डिजिटल डेब्यू आहे, पण राज आणि डीकेसोबत काम करणे घरासारखे वाटले. आणि विजय सेतुपती, नानू (अमोलजी), काय के मेनन यांसारख्या प्रतिभाशाली सहकलाकारांसोबत काम करणे, राशीचे स्वतःचे आकर्षण होते. कलाकार उर्फ सनी ही भूमिका साधी नव्हती, व्यक्तिरेखा खूपच गुंतागुंतीची आहे, त्याची परिस्थिती आणि चांगल्या आयुष्याची त्याची हाव त्याला काही निर्णय घेण्यास भाग पाडते, ज्याचा त्याने विचार केला असेलच असे नाही. मला खात्री आहे की, प्रेक्षकांना हा कार्यक्रम आवडेल, त्यांना विनोद, धीरगंभीरपणा आणि एकंदर कथेचा आनंद मिळेल, ते त्यांना त्यांच्या आसनांच्या टोकावर ठेवेल. आणि अर्थातच, प्राइम व्हिडिओ ही मालिका जगभरातील प्रेक्षकांपर्यंत नेणार आहे, उससे बेहतर क्या ही हो सक्ता है, ज्यामुळे जगभरातील लोकांना हा अप्रतिम कंटेंट पाहायला मिळेल.”
“राज आणि डीके या डायनॅमिक जोडीसोबत आणि शाहीद कपूरसोबत काम करताना खूप आनंद झाला, जो एक प्रतिभावान अभिनेता आणि एक अद्भुत व्यक्ती आहे. एवढ्या उत्कृष्ट टीमसोबत काम करणे आणि फर्जीसारखे काहीतरी मनाला आनंद देणारे निर्माण करणे हे अविश्वसनीय होते. मी यापेक्षा चांगल्या डिजिटल पदार्पणाचा विचार करू शकत नाही आणि मालिकेच्या जागतिक प्रकाशनासाठी मी उत्साहित आहे.” विजय सेतुपती म्हणाले.