प्रत्येक विद्यार्थ्याच्या कोविडउत्तर कामगिरीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 31 टक्क्यांची लक्षणीय सुधारणा आढळली आहे; वार्षिक एक्सीड लर्नोमीटर स्किल टेस्ट 2022 मध्ये इंग्रजीत 30%, गणितात 26%, विज्ञानात 39% तर कम्युनिकेशन स्किल्समध्ये 47% सुधारणा दिसून आली
नवी दिल्ली: जानेवारी 10, 2023 – शाळेत जाणारी मुले कोविड साथीतील शैक्षणिक खंडामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी अद्याप झगडत असताना, एक्सीड या सिंगापोरस्थित, गुणवत्तासिद्ध केलेल्या तसेच सीबीएसई, आयसीएसई, राज्यांचे बोर्ड्स व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम यांना जोडलेल्या, अध्यापन पद्धतीने विद्यार्थ्यांना अध्ययनातील या प्रचंड संकटावर मात करण्याची क्षमता दिली आहे. या संकटातून अधिक माहिती, आत्मविश्वास प्राप्त झालेल्या आणि सर्वांगीण विकास झालेल्या व्यक्ती म्हणून बाहेर येण्याची क्षमता एक्सीडने विद्यार्थ्यांना दिली आहे. एक्सीडने भारतातील 20हून अधिक राज्यांतील नर्सरी ते इयत्ता 8 मधील 2 दशलक्षांहून अधिक विद्यार्थ्यांना सेवा दिली आहे.
एक्सीड लर्नोमीटर स्किल्स टेस्ट 2022 या भारतातील शालेय विद्यार्थ्यांद्वारे दिल्या जाणाऱ्या सर्वांत मोठ्या व सर्वांत सर्वसमावेशक कौशल्याधारित चाचण्यांपैकी एक असलेल्या चाचणीच्या अलीकडील निरीक्षणांमध्ये असे आढळून आले आहे की, एक्सीड कार्यक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोविडउत्तर अध्ययनात उत्तम प्रगती दाखवली आहे. विद्यार्थ्याच्या मागील वर्षाच्या कामगिरीच्या तुलनेत या वर्षीच्या कामगिरीत 31 टक्के सुधारणा आहे. याशिवाय, एक्सीडच्या मुलांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत इंग्रजीत 30%, गणितीत 26 टक्क्यांहून अधिक आणि विज्ञानात 39 टक्क्यांहून अधिक प्रगती दाखवली आहे.
एक्सीड लर्नोमीटर टेस्ट 90 मिनिटे (इयत्ता 1-3) ते 120 मिनिटे (इयत्ता 4-8) कालावधीची कम्प्युटर आधारित वार्षिक परीक्षा आहे आणि पारंपरिक परिक्षांहून ती अधिक कठीण समजली जाते. कारण, यामध्ये विद्यार्थ्यांनी केवळ तथ्ये व सूत्रे आठवून ती मांडणे अपेक्षित नाही, तर त्यांच्या ज्ञानाचे उपयोजन करणे अपेक्षित आहे.
तीन मुख्य विषयांशिवाय, तीन महत्त्वाच्या कौशल्यांचे मूल्यमापन या परीक्षेत केले गेले. ती कौशल्ये म्हणजे संकल्पनात्मक समज, समस्या-निवारण व संवाद. यापैकी संवाद कौशल्यांमध्ये मुलांनी सर्वोच्च म्हणजे 47 टक्के सुधारणा दाखवल्याचे आढळले.
याशिवाय, विद्यार्थ्यांची कसोटी बघणाऱ्या माध्यमिक शाळेच्या वर्षांमध्ये (इयत्ता 6, 7, 8) एक्सीड विद्यार्थ्यांची कामगिरी नॉन-एक्सीड विद्यार्थ्यांच्या तुलनेत 21 टक्के अधिक चांगली होती. समवयस्कांच्या तुलनेत अधिक चांगली इंग्रजी संवाद कौशल्ये (+22%) व अधिक चांगली संकल्पनात्मक समज (+29%) यांमुळे एक्सीड विद्यार्थ्यांची कामगिरी चांगली राहिली.
“या निकालांची प्रोत्साहक दिशा बघून आम्हाला आनंद झाला आहे. एक्सीड एडटेकमधील ‘एड’वर (शिक्षण) भर देत आहे हे या निकालांतून दिसून येते. कोविडकाळात झालेल्या अध्ययनाच्या नुकसानामुळे पालकांना चिंता वाटत आहे आणि ती वाटणे योग्यही आहे, पण किमान एक्सीडच्या विद्यार्थ्यांचे गाडे तरी रुळावर येत आहे असे या निकालांवरून दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे, वरील इयत्तांमधील एक्सीड विद्यार्थ्यांनी समवयस्कांच्या तुलनेत 20% श्रेष्ठ कामगिरी केली आहे. यातून ते बोर्डाच्या परिक्षेसाठी सज्ज आहेत हे दिसून येते. तसेच मुलांचा शैक्षणिक पाया भक्कम करण्यासाठी केलेली गुंतवणूक कशी मोलाची ठरते हेही दिसून येते. आम्ही या अभ्यासाचा विस्तार करणे कायम राखू आणि तो अधिक समृद्ध व ठोस कसा होईल हे बघू,” असे एक्सीड एज्युकेशनचे संस्थापक तसेच हार्वर्डचे माजी विद्यार्थी आणि जागतिक ख्यातीचे शिक्षणतज्ज्ञ डॉ. हॉवर्ड गार्डनर यांचे माजी विद्यार्थी, आशीष राजपाल म्हणाले.
एक्सीड शैक्षणिक कार्यक्रम ही संशोधनावर आधारित अध्यापन पद्धती असून, ती शाळांमध्ये उपयोगात आणली जाते. याद्वारे विद्यार्थ्यांची संकल्पनात्मक विचारपद्धती व आकलन सुधारते, इंग्रजी भाषेतील अभिव्यक्ती सशक्त होते आणि आत्मविश्वास वाढतो.
2014 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर आरंभ झाल्यापासून, एक्सीडने भारतातील 220हून अधिक जिल्ह्यांतील व 20हून अधिक राज्यांतील 2 दशलक्षांहून अधिक विद्यार्थ्यांना सेवा दिली आहे. भारत, फिलिपाइन्स आणि आखाती देशांसह एकूण आठ देशांमध्ये ही पद्धती उपयोगात आणली जात आहे.