मुंबई: डिसेंबर 2022: अलीकडे संपन्न झालेल्या केल्पएचआर पॉश अवॉर्डस्® मध्ये मॅरिको, टीसीई, ऊबर, टाटा पॉवर आणि वॉल्वोला 25 कंपन्यांमध्ये ‘इंडियाज टॉप सेफेस्ट वर्कप्लेस’ (भारतातील सर्वोच्च सुरक्षित कार्यस्थळे) म्हणून घोषित करण्यात आले. या पुरस्काराचे आयोजन केल्पएचआर या कंपनीने केले होते. ही कंपनी सर्वोत्तम एचआर पद्धतींचा अवलंब करत असून सुरक्षित, आनंदी आणि सर्वसमावेशक कार्यस्थळे निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करून आहे.
PoSH (लैंगिक छळ प्रतिबंधक) मधील सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करून देशातील कार्यालयीन ठिकाणे सर्वात सुरक्षित आहेत याची खात्री करण्यासाठी कंपन्यांनी दिलेले वाढते महत्त्व प्रतिबिंबित करून, केल्पएचआरला स्टार्ट-अप, मर्यादित-दायित्व भागीदारी, सूक्ष्म, लहान आणि मध्यम उद्योग (MSME) तसेच मोठी महामंडळाकडून नोंदणीसाठी विचारणा करण्यात येते. पीओएसएच अनुपालन, कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव सक्रिय स्वारस्य आणि त्यांच्या संस्कृतीचे प्रतिबिंब असलेल्या इतर व्यापक निर्देशांकांच्या आधारावर न्याय करण्यात येतो.
अखंड आणि अत्याधुनिक डिजिटल पायाभूत सुविधेद्वारे दोन-स्तरीय तपशीलवार पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ मूल्यमापनावर सहभागींना न्याय देण्यात आला. प्रत्येक संस्थेला सर्वसमावेशक प्रश्नावली भरण्यास आणि प्रमाणीकरणासाठी संबंधित सहाय्यक कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. सर्वोच्च निवडीत समाविष्ट संस्थांना देखील कर्मचारी सर्वेक्षणात सहभागी व्हावे लागले. ज्यामध्ये किमान कर्मचार्यांनी उत्तर देणे अपेक्षित होते. या वर्षातील शीर्ष 25 सर्वात सुरक्षित कार्यस्थळे घोषित करण्यासाठी अंतीम गुण एकत्रित करण्यात आले.
“आम्ही 2021 च्या तुलनेत यंदा पुरस्कारांसाठी आमच्यापर्यंत प्राप्त झालेल्या नामांकनांच्या संख्येत मोठी वाढ पाहिली आहे. अधिक संस्था त्यांच्या व्यवसायासाठी आणि लोकांच्या भरभराटीसाठी सुरक्षित कामाचे वातावरण निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक जबाबदारी घेत असल्याचे आमच्या निदर्शनास आले. आम्ही विजेत्यांचे अभिनंदन करतो. यामध्ये विविध उद्योगांतील लहान ते मोठ्या सर्व आकाराच्या संस्थांचा समावेश आहे, योग्य आदर्श ठेवल्याबद्दल आणि अधिक कार्यस्थळांना हा उद्देश पुढे नेण्यासाठी प्रोत्साहित केल्याबद्दल त्यांचे कौतुक!,” असं केल्पएचआरच्या सीईओ आणि सह-संस्थापक स्मिता शेट्टी कपूर म्हणाल्या.
“टीसीई’मध्ये, आमची वैविध्यपूर्ण कार्यशक्ती समानतेवर आधारलेली संस्कृती आम्हाला मजबूत करते. आमच्या कर्मचार्यांची सुरक्षा आणि कल्याण हा सांस्कृतिक नमुना मुख्य सिद्धांत आहे. मोकळेपणा वाढविणे आणि आमच्या कर्मचार्यांची काळजी घेणारे तसेच सुरक्षित कार्यालयीन वातावरण प्रदान करण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो, जिथे त्यांना त्यांचे सर्वोत्तम काम करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येते. सर्वसमावेशक कार्यालयीन बळ तयार करण्याच्या आमची बांधिलकी आज केल्पएचआर POSH अवॉर्ड्सद्वारे बळकट झाली आहे, आणि इतर संस्थांना या प्रसंगी उदयास
येण्यासाठी आदर्श म्हणून पुढे जाणाऱ्या शीर्ष 25 कंपन्यांच्या यादीत सामील होणे हा आमच्यादृष्टीने सन्मान आहे”, असे टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स लिमिटेड’च्या CHRO आणि मुख्य नैतिक सल्लागार निधी मेहंदीरत्ता यांनी सांगितले.
“भारतातील शीर्ष 25 सुरक्षित कार्यस्थळांमध्ये स्थान पटकविण्याची जाणीव खूप छान आहे. एक सर्वसमावेशक कार्यस्थळ संस्कृती निर्माण करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. जिथे सर्व सदस्यांना सुरक्षित वाटेल आणि ते काम करण्यासाठी त्यांचे सर्वोत्तम देण्यास सक्षम असतील. सुरक्षित आणि भेदभावरहित कार्यस्थळ संस्कृती निर्माण करण्याबाबत आमच्या सदस्यांमध्ये संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी आम्ही अनेक सक्रिय उपाययोजना आखत आहोत. अशाप्रकारचे आयोजन केल्याविषयी आणि मॅरिकोला मान्यता दिल्याबद्दल आम्ही केल्पएचआर’चे आभार मानतो”, असे मॅरिको लिमिटेडचे मुख्य मनुष्यबळ अधिकारी अमित प्रकाश म्हणाले.
ज्युरी सदस्यांमध्ये सहभागी नामांकित – राजकुमार श्रीवास्तव – संस्थापक सदस्य आणि भागीदार, एसके वेस्टिजियम एलएलपी; अंशुल पारेख — भागीदार खेतान अँड कंपनी; ज्योती ग्रोव्हर – अध्यक्ष, गुडगाव जिल्हा LCC 2022; डॉ. अंकिता सिंग – एचआर, आयटी, ट्रॅव्हल आणि अॅडमिन, सिग्नेक्सचे एसव्हीपी आणि ग्लोबल हेड; हरीश सदानी – सह-संस्थापक आणि कार्यकारी संचालक, मेन अगेन्स्ट व्हायोलन्स अँड अब्यूज (MAVA); शांता वॅलरी गांधी – माजी प्रमुख – एचआर, सीएसआर आणि इंटर्नल ब्रँडिंग, आरबीएल बँक आणि सुहेल अब्बासी – सह-संस्थापक आणि अध्यक्ष, द हमसफर ट्रस्ट.
2022’चे विजेते आहेत:
1.एबीसी कन्सलटंटस् प्रायव्हेट लिमिटेड
2. आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड (EGL)
3. अॅव्हॅलिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड
4. डीबीएस बँक इंडिया लि.
5. फ्लॅटिरॉन्स सोल्युशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड
6. फोर्ड मोटर प्रायव्हेट लिमिटेड
7. इंडिया फॅक्टरिंग अँड फायनान्स सोल्युशन्स प्रा. लि.
8. इंग्राम मायक्रो
9. मॅरिको लिमिटेड
10. मेरिट डेटा अँड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड
11. मायक्रोन टेक्नॉलॉजी ऑपरेशन्स इंडिया एलएलपी
12. मूव्हेट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड
13. एमफेसिस लिमिटेड
14. संहिता सोशल व्हेंचर्स
15. शेल इंडिया मार्केट्स प्रा. लि.
16. स्क्वेअर पांडा – भारत
17. टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स लिमिटेड
18. टाटा मेडिकल
19. टाटा पॉवर कंपनी लि.
20. टेकअस्पेक्ट सोल्यूशन्स प्रा. लि.
21. टायटोव्हरी इंडिया
22. टीव्हीएस ईलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड
23. ऊबर इंडिया
24. व्हिजन स्प्रिंग फाऊंडेशन
25. वॉल्वो ग्रुप इंडिया
आनंदी आणि सुरक्षित कार्यस्थळे निर्माण करण्यासाठी अथक काम करणाऱ्या संस्थांच्या मान्यतेकरिता आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी 2020 मध्ये केल्पएचआर PoSH पुरस्कारांची स्थापना करण्यात आली. केल्पएचआर पॉश अवॉर्डस् ® 2022 पुरस्कार विजेत्यांना 9 डिसेंबर 2022 रोजी मुंबईतील एमसीए रिक्रिएशन सेंटर, बीकेसी येथे आयोजित कार्यक्रमात गौरविण्यात येईल.
केल्पएचआर’बद्दल
साल 2013 मध्ये सुरक्षित, आनंदी आणि सर्वसमावेशक कार्यस्थळे तयार करण्याच्या दृष्टिकोनातून केल्पएचआर’ ची स्थापना करण्यात आली. आनंदी कर्मचारी उत्पादनक्षम गटाची निर्मिती करू शकतात या मूळ विश्वासासह, टीम केल्पएचआर’ने संस्थांना केवळ सर्वोत्तम एचआर पद्धतींच्या बाबतीतच नव्हे तर एकूण संस्थात्मक कार्यक्षमतेच्या बाबतीतही नवीन मापदंड निर्माण करण्यास सक्षम करण्यासाठी एक अभियानाची सुरुवात केली.
केल्पएचआर हे कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक (PoSH) मधील कायदेशीर गुंतागुंत सुलभ करण्यात अग्रणी असून त्यासोबतच, विविधता, समानता आणि समावेश (D, E&I) या अल्प प्रमाणात समजून घेण्यात आलेल्या विषयाला स्पष्ट करण्याचा हेतू बाळगून आहे.
2019 पर्यंत, केल्पएचआर म्हणजे सुरक्षित आणि आनंदी कार्यस्थळांकरिता समानार्थी नाव बनले होते; त्यामुळे, कर्मचार्यांच्या भावनिक/मानसिक आरोग्याविषयी चर्चा करण्यासाठी त्यांची उपलब्धतता स्वाभाविक होती. क्लायंट आणि समाजाच्या गरजांना प्रतिसाद देत, केल्पएचआर’ने कर्मचार्यांचे मानसिक आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी प्रभावी कर्मचारी सहाय्य कार्यक्रम (EAP) तयार केले.