४० पदवी अभ्यसक्रमांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
पात्र विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्तींचा शुभारंभडिसेंबर २०२२: आरव्ही युनिव्हर्सिटी या भारतातील उदारमतवादी शिक्षणासाठी आधुनिक युनिव्हर्सिटीने वर्ष २०२३-२४ साठी प्रवेशप्रक्रिया सुरू केली आहे. युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ बिझनेस, स्कूल ऑफ इकोनॉमिक्स, स्कूल ऑफ कम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजीनिअरिंग, स्कूल ऑफ डिझाइन अॅण्ड इनोव्हेशन, स्कूल ऑफ लिबरल आर्टस् अॅण्ड सायन्सेस आणि नवीन लाँच करण्यात आलेले स्कूल ऑफ लॉ या सहा स्कूल्समध्ये त्यांच्या पदवीपूर्व व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी अर्ज स्वीकारत आहे.
“आरव्ही युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही आंतरविद्याशाखीय, प्रायोगिक शिक्षणाचे वातावरण देतो. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण आणि सर्जनशील विचारांद्वारे विद्यमान तत्त्वांना आव्हान देत नवीन ज्ञान मिळवण्यास प्रेरित करतो. आमचे अभ्यासक्रम हे अनिश्चित जगासाठी तयार होण्यास मदत करण्यासाठी प्रभावी संवाद, गंभीर विचार आणि समस्या सोडवण्याची जीवनभर कौशल्ये आत्मसात करण्याकरिता डिझाइन केलेले आहेत. जागतिक दर्जाच्या सर्वांगीण शिक्षणासह आमच्या विद्यार्थ्यांना सक्षम करण्यावर आमचा विश्वास आहे. आरव्हीयू अध्यापन, संशोधन, क्षमता बांधणी आणि सामुदायिक सहभागामध्ये उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील आहे”, असे आरव्ही युनिव्हर्सिटीचे व्हाइस चान्सलर प्राध्यापक वाय.एस.आर. मूर्ती म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “युनिव्हर्सिटी निवडण्यासाठी मोठ्या, लहान व विशेषीकृत अशा व्यापक श्रेणीसह ४० हून अधिक अभ्यासक्रम देते. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी शोधण्यासाठी आणि त्यांच्या आवडींचा पाठपुरावा करण्यासाठी विविध विषय एक्सप्लोर करण्यास प्रेरित केले जाते.’’
आपले मत व्यक्त करत आरव्हीयूचे प्रो-चान्सलर डॉ. (एच.सी.) ए.व्ही.एस. मूर्ती म्हणाले, “सध्याच्या पिढीच्या विद्यार्थ्यांच्या वाढत्या आकांक्षा पूर्ण करू शकतील अशा उच्च दर्जाच्या उच्च शैक्षणिक संस्थांची भारतात खरी कमतरता आहे. आरव्ही युनिव्हर्सिटी शैक्षणिक उत्कृष्टता आणि संशोधनाद्वारे ही पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करते. आवश्यक आर्थिक संसाधने उपलब्ध करून देण्यासाठी, जागतिक दर्जाच्या भौतिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आणि आरव्ही युनिव्हर्सिटीची भरभराट होण्याकरिता शैक्षणिक स्वातंत्र्य देण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत.”
आरव्हीयूचे प्रो-व्हाइस चान्सलर श्री. डी.पी. नागराज म्हणाले, “भारताची सिलिकॉन व्हॅली आणि इनोव्हेशन हब असलेल्या बेंगळुरूमध्ये शिक्षण घेतल्याने अनेक संधी उपलब्ध होतात. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांमधील विविधतेसाठी कटिबद्ध आहोत आणि भारत, दक्षिण आशिया व उर्वरित जगातून विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेऊ इच्छितो. आम्ही उद्योग, नागरी समाज तसेच जगभरातील ७५ हून अधिक उच्च दर्जाच्या युनिव्हर्सिटींसह सहयोग केला आहे, जे आमच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक उत्साहवर्धक संधी उघडतील. मी संभाव्य विद्यार्थ्यांना त्यांचा पुरेपूर वापर करण्यास प्रोत्साहित करतो.”
उमेदवार युनिव्हर्सिटीच्या https://admissions.rvu.edu.in/ वेबसाइटवर उपलब्ध ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात. पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठी पात्रता निकष आहे १०+२ किंवा सीबीएसई, आयएससी, आयबी, केंब्रिज, राज्य मंडळे आणि इतर सरकार मान्यताकृत मंडळांचे समतुल्य पूर्णत्व प्रमाणपत्र. निवड निकष अर्जदाराच्या आरव्ही स्कॉलेस्टिक अॅडमिशन टेस्ट (आरव्हीएसएटी) आणि आरव्ही युनिव्हर्सिटीच्या निवड प्रक्रियेतील कामगिरीवर आधारित असतील. आरव्हीएसएटी ही आरव्ही युनिव्हर्सिटीच्या सर्व यूजी व पीजी अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय-स्तरीय प्रवेश परीक्षा आहे. युनिव्हर्सिटी पात्र विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती देत आहे.
स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स अॅण्ड सायन्सेसचा उद्देश उदारमतवादी शिक्षणाची पुनर्कल्पना करणे आहे. हे पर्यावरण विज्ञान/मानसशास्त्र/चित्रपट निर्मितीमधील बी.एससी. किंवा. चित्रपट अभ्यास/साहित्य व सांस्कृतिक अभ्यास/भारतीय अभ्यास/राजकीय आणि आंतरराष्ट्रीय संबंध/तत्वज्ञान यातील बी.ए पदवी सह तिसऱ्या वर्षाच्या शेवटी बाहेर पडण्याच्या पर्यायासोबत चार वर्षांचे बॅचलर ऑफ लिबरल आर्टस् (बी.एल.ए.) देते.
स्कूल ऑफ डिझाइन अॅण्ड इनोव्हेशनचे उद्दिष्ट ‘डिझाइन एज्युकेशन पुन्हा परिभाषित करणे’ आहे. हे निवडण्यासाठी चार स्पेशलायझेशनसह पदवी – संप्रेषण डिझाइन, उत्पादन डिझाइन, स्थानिक व अंतर्गत डिझाइन आणि वापरकर्ता अनुभव डिझाइनसह चार वर्षांचे बी.डीईएस. देते आणि दोन वर्षांची एम.डीईएस वापरकर्ता अनुभव डिझाइनमध्ये विशेषीकरण देते. यात विविध अध्यापनशास्त्रीय मॉडेल्समधील सर्वोत्कृष्ट पद्धतींचा समावेश करण्यात आला आहे आणि ज्ञान निर्मिती, ज्ञान प्रसार व ज्ञानाचा उपयोग एकमेकांना सहअस्तित्वात व प्रेरणा देणारे वातावरण तयार करत आहे.
स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनीअरिंग पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासासाठी विस्तृत अभ्यासक्रम देते. स्कूलचे ध्येयवाक्य ‘व्हेअर आयडियाज इग्नाइट माइण्ड्स’शी बांधील राहत हे स्कूल परीक्षा-केंद्रित शिक्षणाऐवजी अनुभवात्मक, समग्र शिक्षणाद्वारे २१व्या शतकातील कौशल्ये प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करते. ऑफर केलेले अभ्यासक्रम आहेत कॉम्प्युटर सायन्स/डेटा सायन्स/डिसिजन सायन्सेसमधील मेजरसह चार-वर्षांचे बी.एससी. (ऑनर्स) आणि एआय व एमएल/नेटवर्क्समधील मेजरसह कॉम्प्युटर सायन्स व इंजीनिअरिंगमधील बी.टेक (ऑनर्स). विद्यार्थ्यांना एआय, मशिन लर्निंग व डेटा सायन्स/ फुल स्टॅक अॅप्लीकेशन डेव्हलपमेंट इन क्लाऊड/नेटवर्क्स, आयओटी व सायबरसिक्युरिटी/मेटाव्हर्स, एआर/व्हीआर आणि स्पेशलायझेशनसाठी गेमिंग असे निवडण्याकरिता विविध पर्याय आहेत.
याव्यतिरिक्त स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजीनिअरिंग पूर्ण-वेळ विद्यार्थ्यांसाठी, तसेच श्रमजीवी व्यावसायिकांसाठी विविध दोन-वर्षांचे पीजी अभ्यासक्रम देते. ऑफर करण्यात आलेले अभ्यासक्रम आहेत एम.टेक., कॉप्युटर सायन्स अॅण्ड इंजीनिअरिंग विथ स्पेशलायझेशन इन व्हीएलएसआय डिझाइन इन कोलॅबोरेशन विथ आरव्ही स्किल्स/एआय, एमएल आणि डेटा सायन्स इन कोलॅबोरेशन विथ अपग्रॅण्ड कॅम्पस. स्कूल एमबीएसह बी.टेक. (ऑनर्स) कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजीनिअरिंगमधील पाच-वर्षांचा एकीकृत अभ्यासक्रम देखील देते.
स्कूल ऑफ इकोनॉमिक्स बी.ए. (ऑनर्स) इकोनॉमिक्स व एम.ए. इकोनॉमिक्स या अर्थशास्त्राच्या क्षेत्रातील यूजी व पीजी अभ्यासक्रम देते. ‘वास्तविक समस्यांचे निराकरण करण्यासाठी वास्तविक जगाचे अर्थशास्त्र’ या विषयावर प्रबळ शिस्तबद्ध ज्ञान असलेल्या विचारसरणीच्या व्यक्ती तयार करणे हे स्कूलचे उद्दिष्ट आहे.
स्कूल ऑफ बिझनेस चार वर्षांच्या यूजी अभ्यासक्रमासह तिसऱ्या वर्षानंतर उपलब्ध बाहेर पडण्याचा पर्याय देते. हे अभ्यासक्रम उदयोन्मुख व्यवसाय स्थिती लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आले आहेत. ऑफरिंग्ज ‘रिथिंकिंग मॅनेजमेंट एज्युकेशन: नोईंग, डूईंग, इनोव्हेटिंग’ या दृष्टिकोनाशी संलग्न आहेत. उमेदवार फायनान्स/आंत्रेप्रीन्यअरशीप/मार्केटिंग/बिझनेस/ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील स्पेशलायझेशनसह बी.बी.ए. (ऑनर्स) साठी किंवा बी.कॉम (ऑनर्स) साठी अर्ज करू शकतात आणि स्पेशलायझेशन इन फायनान्स अॅण्ड अकाऊंटिंग/बँकिंग अॅण्ड इन्शुरन्स/वेल्थ मॅनेजमेंटचा अवलंब करू शकतात.
कायदेविषयक शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे उद्दिष्ट असलेले स्कूल ऑफ लॉ पदवीपूर्ण व पदव्युत्तर अभ्यासक्रम देते. विद्यार्थी पाच वर्ष एकीकृत बी.ए.एलएल.बी. (ऑनर्स) किंवा बी.बी.ए. एलएल.बी. (ऑनर्स) किंवा एलएल.एम.साठी नोंदणी करू शकतात.