महाराष्ट्रातील नाशिक येथे आयोजित भारतातील सर्वात मोठ्या अॅग्री एक्स्पोमध्ये
ब्रँडचे तीन ट्रॅक्टर होणार सादर
नाशिक, २५ नोव्हेंबर २०२२ सीएनएच इंडस्ट्रियलचा ब्रँड न्यू हॉलंड अॅग्रीकल्चर कृषीथॉन या भारताच्या प्रमुख आंतरराष्ट्रीय कृषी व्यापार मेळाव्याच्या १५ व्या सत्रात त्याच्या उपकरणांची श्रेणी सादर करत आहे. नाशिकमधील ठक्कर डोम येथे २४-२८ नोव्हेंबर दरम्यान चार दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. .
हा ब्रँड नुकताच सादर केलेला ब्लू सीरीज सिम्बा 30 कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर या कार्यक्रमाला येणाऱ्यांसाठी प्रदर्शित करत आहे. तीन-सिलेंडर 29HP मित्सुबिशी इंजिनद्वारे समर्थित ब्लू सीरीज SIMBA 30 उच्च उर्जा आणि इंधन कार्यक्षमतेवर केंद्रित आहे. नॅरो ट्रॅक आणि उच्च शक्तीच्या संयोगाचा अनोखा लाभ देखील ते देते. त्यामुळे तो या श्रेणीतील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण ट्रॅक्टर बनत आहे. न्यू हॉलंड 3230 TX SUPER आणि न्यू हॉलंड 3037 TX SUPER हे प्रदर्शनातील इतर ट्रॅक्टर्स आहेत.
सहभागाबद्दल बोलताना सीएनएच इंडस्ट्रीयल या कृषी ब्रँड इंडियाचे संचालक श्री. गगन पाल म्हणाले, “कृषिथॉनचा एक भाग होण्यासाठी आणि आमच्या हितचिंतकांना आमच्या ट्रॅक्टर्सची आधुनिक श्रेणी दाखवून देण्यासाठी आम्ही उत्साहित आहोत. द्राक्षे आणि फलोत्पादन लागवडीचे केंद्र असल्याने महाराष्ट्र आमच्यासाठी प्रमुख बाजारपेठांपैकी एक आहे. प्रदर्शनातील आमची उत्पादने ग्राहकांच्या विविधांगी आणि समकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी ब्रँडची क्षमता प्रतिबिंबित करतात. आम्हाला खात्री आहे की ब्लू सीरीज सिम्बा 30 त्याचे कॉम्पॅक्ट डिझाइन आणि अत्याधुनिक वैशिष्ट्ये यांनी शोमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेईल.
कृषीथॉन हे भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन आहे जे देशातील वाईन कॅपिटल – नाशिक येथे भरते. कृषी क्षेत्रातील नवनवीन शोध दाखविण्यात हे प्रदर्शन महत्त्वाची भूमिका बजावते. हे उत्पादक, पुरवठादार आणि कृषी आणि संलग्न क्षेत्रांसाठी मोठ्या व्यवसायाची संधी देते. हे शेतकरी आणि कृषी उपकरणांच्या मालकांना योग्य लोकांशी जोडण्यात देखील मदत करते. गेल्या १५ वर्षांपासून कृषीथॉन देशातील शेतकऱ्यांना अद्ययावत करण्यासाठी नवीनतम तंत्रज्ञान, कौशल्य, अनुभव आणि व्यवसाय यांचा यशस्वीपणे मिलाफ करत आहे.
न्यू हॉलंड अॅग्रीकल्चरचे उद्दिष्ट शेतकर्यांना अधिक उत्पादनक्षम, कार्यक्षम आणि प्रभावी पद्धतीने शेती करण्याच्या त्यांच्या प्रवासात त्यांच्या उत्पादनांसह उत्कृष्ट तंत्रज्ञान आणि कार्यक्षमतेने पाठबळ देण्याचे आहे.