नवी मुंबई : नवी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला हॉस्पिटलच्या चेअरपर्सन श्रीमती टीना अंबानी उपस्थित होत्या . यावेळी त्यांनी रुग्णालयातील सुविधांचा आढावा घेतला तसेच रुग्ण, डॉक्टर आणि परिचारिकांशी संवाद साधला.
याप्रसंगी अध्यक्षा टीना अंबानी यांनी कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या गर्भवतींची भेट घेतली आणि त्यांनी काही नवजात बालकांची प्रकृती जाणून घेतली. तसेच गर्भवती महिला आणि नवजात बालकांना अंबानी यांनी आशीर्वाद दिले. डायलिसिस आणि कर्करोगाच्या रूग्णांसह इतर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांचीही त्यांनी विचारपूस केली. रुग्णांशी संवाद साधत अंबानी यांनी हास्पिटलमधील अनुभव, हॉस्पिटल आणि नंतरच्या उपचार पद्धतीची चौकशी केली.