मुकुंद रांजाणे ( माथेरान)
सातत्याने गरजवंताना सढळ हाताने मदतीला धावून जाणारे निस्वार्थी व्यक्तीमत्व म्हणून ज्यांचे नाव संपूर्ण पंचक्रोशीत दूरवर पसरले आहे त्या चंदीभाई चौधरी यांच्या मित्र परिवाराकडून गरजवंतांना मासिक हप्त्याची दिवाळी भेट एकहजार रुपये रोख रक्कम देऊन मासिक पेन्शन योजनेचा आठवा हप्ता देण्यात आला. शिवसेना शाखेत या हप्त्याचे वाटप करण्यात आले यावेळी शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी, मीरा फाउंडेशनच्या संचालिका रेखा चंद्रकांत चौधरी, उप शहरप्रमुख प्रमोद नायक, प्रकाश सुतार, संदिप शिंदे,अनिस शेख,ज्ञानेश्वर बागडे, वसंत कदम, विकास पार्टे, अशोक वाघेला, युवा सेनेचे पदाधिकारी गौरंग वाघेला, निखिल शिंदे,अनिकेत जाधव, दर्शन घाग,महिला आघाडीच्या संगीता जांभळे, सुहासिनी शिंदे, शलाका शेलार आदी उपस्थित होते.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गरजवंताला मदतीचा हातभार लागावा या उद्देशाने चंदीभाई चौधरी यांच्या मित्र परिवाराकडून गरजवंतांना मासिक हप्त्याची दिवाळी भेट देण्यात आली आहे. याचा लाभ एकूण दीडशे जणांनी घेतला.राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी माथेरान मध्ये राजकारणात सक्रिय आहेत परंतु ही मंडळी समाजकारणात पिछाडीवर असतात केवळ निवडणूक काळात पंचवार्षिक योजनेप्रमाणे मतदारांना आमिषे देऊन मतांच्या जोगव्यासाठी उंबरठे झिजवतात परंतु इतर वेळेस त्याना इथली सर्वसामान्य जनता कोणत्या हालअपेष्टा सोसत असतात मंदीच्या वेळी ज्यांचे हातावर पोट असते त्यांना काही अत्यावश्यक गरज आहे का याकडे दुर्लक्ष केले जाते. चंद्रकांत चौधरी हे मागील सत्तेचेमुख्य केंद्रबिंदू असताना सत्तेचा कोणत्याही प्रकारचा लाभ न घेता स्वखर्चाने कोरोना काळात सुध्दा गरजवंत लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला होता.घोड्यांचे खाद्य सुध्दा त्यांनी पुरविले होते. आज दि.१६ रोजी मासिक पेन्शन योजनेचा आठवा हप्ता देऊन त्यांनी अनेक कुटुंबातील सदस्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.