मंगल गिरी यांनी इन्स्टाग्रामवर विविध गाण्यांवर रिल्स बनवले. याचे रिल्सचे व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले
अलिकडेच त्यांनी एसटी महामंडळाची वर्दी घालून तुळजाभवानी देवीच्या गाण्यावर त्यांनी एक व्हिडिओ बनवला. त्यांचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला.
या व्हिडिओमुळे एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन झाल्याचं सांगत मंडळाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. यावर चित्रा वाघ, रुपाली चाकणकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
लाखाहून जास्त फोलोअर्स असणार्या महिला कंडक्टरचा ST च्या विविध सुविधा जनतेपर्यंत पोहोचवण्यास उपयोग झाला असता. तसेच सध्या अनेक शासकीय अधिकारी कर्मचारी FB/Twitter/Instagram व इतर समाजमाध्यमांचा वापर करतांना दिसताहेत मग हिच्यावरचं कारवाई करण्याचं कारण काय? असा प्रश्न उपस्थित करत याचं कारण स्पष्ट करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.