ऑक्टोबर,२०२२: टिंडर हे जगातील नवीन लोकांना भेटण्यासाठी सर्वात लोकप्रिय अॅप संमती व सुरक्षित डेटिंगबाबत संवादांना चालना देण्यासाठी त्यांचा उपक्रम ‘लेट्स टॉक कन्सेंट’ पुन्हा घेऊन येत आहे. यंदा मोहिम लघुपट ‘वी नीड टू टॉक’ (We Need To Talk)सह लॉन्च करण्यात आली आहे. हा लघुपट तरुण भारतीय प्रौढांमधील परस्पर संबंधांमधील संमतीच्या बारकाव्यांचा शोध घेतो. यानंतर तज्ञांनी विकसित केलेल्या अद्वितीय कन्सेंट अॅण्ड सेफ डेटिंग अभ्यासक्रमाबाबत सांगण्यात येईल. हा अभ्यासक्रम तरूणांना संबंधित विषयाबाबत उत्तम चर्चा करण्याकरिता योग्य माहिती व सुरक्षित जागा उपलब्ध होण्यासाठी ऑनलाइन व निवडक युनिव्हर्सिटींमध्ये व्यक्तिश: उपलब्ध असेल. यंदाचे उपक्रम गेल्या वर्षी युवा (Yuvaa) व पिंक लीगल (Pink Legal) यांच्यासोबत सहयोगाने लॉन्च करण्यात आलेले टिंडरचे विद्यमान रिसोर्स सेंटर www.letstalkconsent.comवर निर्माण करण्यात आले आहेत.
टिंडरच्या अलीकडील सर्वेक्षणामधून निदर्शनास आले आहे की,भारतातील बहुतेक तरुण प्रौढांना संमती नेव्हिगेट करण्यावर कमी किंवा अजिबात विश्वास नाही आणि त्यांना या विषयावर संभाषण करणे कठीण जाते. मुंबईतील सर्वेक्षण केलेल्यांपैकी ६४ टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना संमती कशी द्यायची, ती कशी मागायची किंवा कोणाशी डेटिंग करताना संमती कशी काढायची हे माहित नाही. त्यांच्या संमतीचे उल्लंघन केले गेले तेव्हा परिस्थितीबद्दल विचारले असता ६५ टक्के तरूण मुंबईकरांनी त्यांच्या डेट/पार्टनरशी याबद्दल न बोलण्याची निवड केलीआणि या विषयावर सतत संवाद साधण्याची गरज स्पष्ट करूनमित्राशी बोलणे व ऑनलाइन संसाधने शोधणे यांना प्राधान्य दिले.खरेतर मुंबईतील यापैकी ८३ टक्के तरूणांचा विश्वास आहे की, पार्टनर्ससोबत संमतीबाबत खुल्या मनाने बोलले पाहिजे.
मुंबईतील टिंडर सदस्य १९ वर्षीय ओम भानुशाली म्हणाला, ‘’माझ्या मते, स्पष्टपणे बोलणे चांगले असते. सुरूवातीला मी बोलणे टाळायचो, ज्याचे गंभीर परिणाम होऊ शकले असते. पण मी माझ्या डेटसोबत संमतीबाबत खुल्या मनाने बोलण्यास सुरूवात केली आणि आम्हाला एकमेकांबाबत अधिक आरामदायी वाटले.’’
“टिंडरच्या सदस्यांसोबतचे आमचे संवाद आणि भारतातील तरुण प्रौढ डेटर्ससोबतच्या सर्वेक्षणामुळे आम्हाला सीमेपलीडकील व परस्पर आदर यावर संभाषणासाठी सुरक्षित जागा निर्माण करण्याची गरज असल्याचे समजले, ज्याबाबत आपल्या समाजात चर्चा होत नाही,” असे टिंडर अँड मॅच ग्रुप, इंडियाच्या जीएम तारू कपूर म्हणाल्या. ‘’आमच्या लेट्स टॉक कन्सेंट (Let’s Talk Consent ) उपक्रमाचा उद्देश तरुण प्रौढांना निवडी, परस्पर सहमती आणि कठीण विषयांवरील खुल्या चर्चेला कसे सामान्य करते हे समजून घेण्यासाठी साधने व संसाधने देणे हे आहे. अॅपमधील सुरक्षा उत्पादने आणि यासारख्या उपक्रमांसहआम्ही देशात उत्तम डेटिंग इकोसिस्टम तयार करण्याप्रती काम करण्यास कटिबद्ध आहोत.’’
सुरक्षेसाठी टिंडरची दीर्घकालीन कटिबद्धता संदेश पाठवण्यासाठी परस्पर संमती आवश्यक आहे या विचारसरणीसह सुरू झाली. गेल्या अनेक वर्षांपासूनअॅपने सर्वोत्कृष्ट-श्रेणी सुरक्षा वैशिष्ट्ये तयार करणे सुरू ठेवले आहे आणि सदस्यांना ते कोणाशी संवाद साधतात यावर पूर्ण नियंत्रण प्रदान केले आहे, कोणत्याही वेळी संमती मागे घेण्याचा अधिकार राखून ठेवत प्रत्येक परस्परसंवादाचा वेग आणि हेतू सेट केला आहे. हा उपक्रम सक्रिय सदस्यांना अॅपमधून माहिती देण्यासाठी टिंडरच्या व्यापक विश्वासपूर्ण व सुरक्षित प्रयत्नांचा एक भाग आहे. अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये आणि उपक्रम आता उद्योगासाठी मानक बनले आहेत, कारण डेटर्सनी टिंडरसोबत त्यांच्या डेटिंग प्रवासादरम्यान आणलेली निवड, नियंत्रण आणि एजन्सी यांना खूप महत्त्व दिले आहे: व्हिडिओ चॅट (Video Chat), जे आरामदायीपणाला प्राधान्य देणा-या प्री-आयआरएल तारखेची सुविधा देण्यासाठी टिंडरच्या सुरक्षा टीमने डिझाईन केले. सदस्य ते कोण आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी फोटो व्हेरिफिकेशन (Photo Verification), कोणतेही सहकारी किंवा माजी व्यक्ती टाळण्यासाठी ब्लॅक कॉन्टॅक्ट्स (Block Contacts),तुम्ही तुमच्या पहिल्या डेटिंगला जाताना तुमच्याकडे सर्व साधने असण्याच्या खात्रीसाठी इतर उत्पादन वैशिष्ट्यांमधील अपडेटेड रिपोर्टिंग प्रोसेस (updated Reporting process), जसे डज दि बॉदर यू (Does This Bother You) व आर यू शुअर (Are You Sure).
व्यासपीठांवर उपलब्ध करून देण्यात आलेला कन्सेंटवरील गेल्या वर्षीचा लघुपट क्लोजर (Closure)ला फॉलो करतसोनम नायर दिग्दर्शित व द स्क्रिप्ट रूम (The Script Room) सोबत सहयोगाने संकल्पना मांडण्यात आलेला टिंडरचा नवीन लघुपट (latest short film) वरील काही प्रतिबंधांचे निराकरण करतो आणि संमतीवर संवाद करण्याच्या महत्त्वाला दाखवतो. यंदाचा लघुपट टिंडरचे इन्स्टाग्राम (Instagram), यूट्यूब (YouTube,) व वूट (Voot) वर पाहता येऊ शकतो.
मुंबईमधून अधिक माहिती:
1. तरूण भारतीयांची संमतीबाबत जाणून घेण्याची व चर्चा करण्याची इच्छा आहे. मुंबईतील तरूणांनी स्वत: या संवादांमध्ये पुढाकार घेतला, जेथे २ पैकी एका तरूणांनी स्वत:ला संमतीबाबत संवाद सामान्य करण्यासाठी सर्वात मोठे माध्यम मानले.
a. संमती शिक्षणाबाबत समुदाय निर्माण करणे. मुंबईतील १० पैकी ८ तरूणांचा विश्वास आहे की, पार्टनर्ससोबत संमतीबाबत अधिक खुल्या मनाने बोलले पाहिजे. यापैकी ७६ टक्के तरूणांची त्याबाबत शाळा व महाविद्यलयांमध्ये बोलले जाण्याची इच्छा आहे आणि ७२टक्के तरूणांनी संमतीची संकल्पना व्यक्तिश: समजून घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
b. संमतीवरील विषयासाठी सुरक्षित ठिकाणे विकसित करणे: मुंबईतील १० पैकी ७ तरूण संमतीबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि त्यांच्या वैयक्तिक बाबींबाबत माहित करून घेण्यासाठी अधिक संसाधने व सुरक्षित ठिकाणांचा (प्रत्यक्ष व ऑनलाइन) शोध घेतात. संमतीवर संवाद सामान्य करण्यासाठी जबाबदार भागधारकांच्या व्यापक समूहामध्ये तरूणांनी या संवादांसाठी जबाबदार अव्वल तीन प्रभावक म्हणून स्वत:ला (५५ टक्के), पालक (४४ टक्के) आणि शाळा व महाविद्यालये (३९ टक्के) यांना प्राधान्य दिले.
c. आयआरएल व यूआरएल अशा दोन्ही संमती आत्मविश्वासाने नेव्हिगेट करणे. संमतीबाबत माहिती मिळवण्याच्या विविध पैलूंमध्ये तरूण मुंबईकर ऑनलाइन (४४ टक्के) कोणाशी भेटताना संमती कशी नेव्हिगेट करावी, त्यांच्या मर्यादा व बंधनांना जाणून घेणे (४१ टक्के), संमतीसाठी कसे विचारावे (४० टक्के)याबाबत जाणून घेण्यास उत्सुक आहेत. यामधून शहरातील संमती मिळवण्याच्या माहितीबाबतची गरज दिसून येते.
2. मन दुखावणे, भांडण किंवा खात्री वाटण्यासंदर्भात संमती मागे पडते. तरूणांना संमतीबाबत संवाद करण्याला प्रतिबंध करणारे किंवा त्यांच्या डेट्स किंवा पार्टनर्सकडे संमती मागण्याच्या अभावासाठी अनेक कारणे आहेत. सर्वात वारंवार दिसून येणारी कारणे आहेत: डेट/पार्टनरच्या मन दुखावण्याची भिती (४१ टक्के), आवडले न जाण्याबाबत चिंता (३६ टक्के), नाही कसे म्हणावे हे माहित नसणे (३३ टक्के)आणि ते स्वत: अशा संवादांबाबत खात्रीदायी असतात (३० टक्के).
3. धोक्याचे निशाण ओळखले, पण त्याचे निराकरण करण्यामध्ये असमर्थ. मुंबईतील तरूणांनी धोक्याच्या चिन्हांसाठी ओळखले जाणारे व्यापक मेटाफॉर्स ओळखले आहेत.
a. गीन फ्लॅग्स: तुम्ही स्वत:शी खरे असल्याने आरामदायी वाटते, ज्यामुळे डेटिंग पार्टनरला तुमच्याबाबत चांगले वाटते आणि ते तुमच्यासाठी वेळ काढण्याला प्राधान्य देतात हे अव्वल तीन ग्रीन फ्लॅग्स आहेत.
b. रेड फ्लॅग्स: मुंबईतील तरूणांनी मते दिलेली अव्वल तीन रेड फ्लॅग्स आहेत जिव्हाळ्याचे फोटो, त्यांच्या आवडी/विश्वासांची खिल्ली उडवणे आणि भेटल्यानंतर काही दिवस एसएमएस न पाठवणे/कॉल न करणे.
या बाबींना प्रत्यक्ष अवलंब करणे कल्पनेपेक्षा अवघड आहे: मुंबईतील ५ पैकी ३ तरूण म्हणतात की त्यांना चुंबन घेण्यास नाही म्हणायला संकोच वाटतो. तसेच इतकेच तरूण म्हणतात की, त्यांना यामुळे अस्वस्थ वाटत असेल तरी ते नाकारण्यास संकोच वाटतो.
4. संमती शारीरिक जवळीक पलीकडे आहे. मुंबईतील तरुणांचा असा विश्वास आहे की, संमती जिव्हाळ्याच्या पलीकडे आहे आणि त्यात गोपनीयतेची व भावनिक मर्यादांची मोठी चिंता समाविष्ट आहे. खरेतर, १० पैकी ४ तरुण मुंबईकरांनी स्पष्ट संमती नसताना कोणाचेही फोटो किंवा संभाषणाचे स्क्रीनशॉट शेअर करणे किंवा कोणाचा फोन किंवा लॅपटॉप न विचारता पाहणे हे गोपनीयतेचे उल्लंघन असल्याचे ओळखले.
*YouGov ने केलेले संशोधन – दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, पुणे, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद येथे १,०१८ भारतीय तरूण प्रौढांचे (१८ ते ३० वर्षे वयोगटातील) सर्वेक्षण.