मेघश्रेय फाउंडेशनने रेव्हरी हार्ट फाऊंडेशन (आय केअर) यांच्या संयुक्त विद्यमाने सडन कार्डियाक अरेस्ट आणि सीपीआर या विषयावर जनजागृती मोहीम आयोजित केली होती. रंग शारदा, वांद्रे येथे होली फॅमिली हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात सीमा सिंग, मेघश्रेय फाऊंडेशन, डॉ. अक्षय मेहता, डॉ. सौम्या राघवन यांच्यासह मुंबई पोलिसांचे अनेक अधिकारी या जनजागृती मोहिमेत सहभागी झाले होते. आयपीएस मंजुनाथ सिंग डीसीपी झोन ९ यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते
यावेळी मेघश्रेय फाऊंडेशनच्या सीमा सिंग म्हणाल्या की “”अपघाती हृदयविकाराचा झटका” साठी जागरुकता अत्यंत महत्वाची आहे. अनेक वेळा सार्वजनिक ठिकाणी असे घडते, अशा परिस्थितीत जनजागृतीने अनेकांचे प्राण वाचवले जाऊ शकतात.