(संतोष सकपाळ स्पोर्ट्स रिर्पोट)
तिरुअनंतपुरम : सुर्यकुमार आणि केएल राहुलच्या शानदार फलंदाजीने भारतीय संघाने आठ गडी राखत दक्षिण आफ्रिका संघावर पहिल्या टी२० सामन्यात विजय मिळवला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर १०७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. एका क्षणी ४२ धावांत सहा विकेट्स गमावलेल्या आफ्रिकन संघाला केशव महाराजांने १०० धावांच्या पुढे नेली. दक्षिण आफ्रिकेने २० षटकांत आठ गडी गमावून १०६ धावा केल्या.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील भारत दौऱ्यातील मालिकेला तिरुअनंतपुरम येथे सुरु असून भारतीय संघाने आज दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना नामोहरम केले. पॉवरप्ले मध्ये अर्शदीपचा दबदबा पाहायला मिळाला. चाहर आणि अर्शदीप या दोघांनी मिळून दक्षिण आफ्रिकन फलंदाजीचे कंबरडं मोडले. त्या दोघांनी मिळून ५ गडी बाद करत निम्मा संघ तंबूत धाडला. भारतीय संघ आजच्या सामन्यात गोलंदाजीच्या जोरावर मजबूत स्थितीत पाहायला मिळतो आहे. निम्या षटकानंतर दक्षिण आफ्रिका संकटात सापडली होती पण केशव महाराजने एक बाजू लढवत ठेवत त्याने ३५ चेंडूत ४१ धावा केल्या. आफ्रिकेची फलंदाजी ही सुमार दर्जाची झाली असून पत्त्याच्या बंगल्यासारखी त्याचे गडी बाद झाले. तत्पूर्वी, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या सामन्यापूर्वी दोन्ही संघ समान समस्येचा सामना करत होते आता मात्र भारत वरचढ ठरताना दिसतो.
सुर्यकुमार यादव आणि राहुल यांनी ५० धावांची भागीदारी ३६ चेंडूत केली.– टीम इंडियाच्या आजच्या विजयाचं श्रेय जात गोलंदाजांना. गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच दक्षिण आफ्रिकेला दबावाखाली ठेवलं. त्यातून शेवटपर्यंत दक्षिण आफ्रिकेची टीम बाहेर येऊ शकली नाही. अचूक टप्पा आणि स्विंगचा फायदा उचलून दक्षिण आफ्रिकन फलंदाजीच कबंरड मोडलं.
– अर्शदीप सिंहने टीमच्या दुसऱ्या आणि व्यक्तीगत पहिल्या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या डावाला खिंडार पाडलं. त्याने एकाच ओव्हरमध्ये तीन विकेट काढल्या. क्विंटन डि कॉक, रिली रुसो आणि डेविड मिलर या दक्षिण आफ्रिकेच्या मोठ्या प्लेयर्सला त्याने तंबूत पाठवलं. रुसो आणि मिलरला अर्शदीपने खातही उघडू दिलं नाही. 4 ओव्हर्समध्ये 32 धावा देऊन तीन विकेट काढल्या.
– दीपक चाहरने पहिल्या ओव्हरपासून टीम इंडियाला यश मिळवून दिलं. त्याने कॅप्टन टेंबा बावुमाला शुन्यावर बोल्ड केलं. त्यानंतर ट्रिस्टन स्टब्सला अर्शदीपकरवी झेलबाद केलं. त्याने दोन्ही फलंदाजंना शुन्यावर बाद केलं.
– तीन ओव्हर्समध्येच दक्षिण आफ्रिकेची 5 बाद 9 अशी स्थिती होती. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेची मोठी भागीदारी होणार नाही याची भारतीय गोलंदाजांनी काळजी घेतली. मार्कराम आणि पार्नेलची जोडी हर्षल पटेलने फोडली. अश्विनने विकेट काढली नाही. पण टिच्चून मारा केला. चार ओव्हर्समध्ये त्याने एक मेडन ओव्हरसह फक्त 8 धावा दिल्या.
– टीम इंडियाची सुरुवात खूप निराशाजनक झाली. कॅप्टन रोहित शर्मा 0 आणि विराट कोहली 3 धावांवर आऊट झाला. त्यानंतर राहुल आणि सूर्यकुमारने जबाबदारी खेळ केला. त्यांनी आणखी पडझड होऊ न देताना टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. केएल राहुलला सूर गवसला ही टीमसाठी चांगली बाब आहे. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 93 धावांची भागीदारी केली.