(संतोष सकपाळ)
मुंबई : करोनाविषयक कडक निर्बंध हटविल्यानंतर हळूहळू सर्व कारभार पूर्ववत झाला असून रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई उपनगरीय रेल्वे आणि मेल-एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाइल चोरणाऱ्या चोरांचा सुळसुळाट झाला असून आतापर्यंत तब्बल अधिकृत आकडेवारीनुसार 10 हजाराहून अधिक मोबाईल लंपास झाले आहेत. त्याच बरोबर अनेक प्रवाशांचे पाकिट अथवा मौल्यवान चीजवस्तूंवर चोरट्यांनी लांबविल्या आहेत. सर्वात जास्त उत्पन्न देणारा हा मुंबई उपनगरीय टप्प्यातच कमकुवत, कमी असणारा सुरक्षाकर्मी मुळेच यातील काही घडलेल्या घटनेच्या अनुशंगाने म्हटले तर ते योग्य ठरेल. कित्येक मोबाईल चोर तर मोबाईल हिसकावून घेताना प्रवाशांच्या जिवावर बेतेल असा हिसडा देतात की यात कैक प्रवाशी जायबंदी झाले आहेत, अथवा जायबंदी झाले आहेत.
मोबाइल चोरी केवळ प्रवाशांनाच नव्हे तर आता लोहमार्ग पोलिसांनाही डोकेदुखी बनली आहे. चोरीला गेलेल्या मोबाइलचा माग काढत लोहमार्ग पोलिसांना परराज्याची वाट धरावी लागत आहे. २०२१ पासून आतापर्यंत प्रवासादरम्यान १० हजार १५९ प्रवाशांचे मोबाइल चोरीला गेले असून यापैकी दोन हजार ६१८ मोबाइल परराज्यातून हस्तगत करण्यात आल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.
गेल्या काही वर्षांपासून मध्य आणि पश्चिम उपनगरीय रेल्वेच्या हद्दीत मोबाइल चोरीचे प्रमाण वाढले आहे. अनेक प्रवाशांचे महागडे स्मार्ट फोन हेरून चोर त्यावर डल्ला मारतात. रुळांजवळील खांबाच्या मागे लपून लोकलच्या दरवाजात उभ्या प्रवाशांच्या हातातील मोबाइल हिसकवून पळ काढायचे प्रकार सर्रास घडू लागले आहेत. अनेक प्रवासी लोकल प्रवासात किंवा फलाटावर मोबाइलवर बोलण्यात दंग असतात. हेच हेरून चोर प्रवाशांचा मोबाइल हिसकावून पळ काढतात. मुंबईत मेल-एक्स्प्रमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीतही असे प्रकार घडत आहेत. मुंबई विभागात जानेवारी २०२१ पासून ऑगस्ट २०२२ पर्यंत १० हजार १५० मोबाइल चोरीचे गुन्हे लोहमार्ग पोलिसांकडे नोंद झाले आहेत. यापैकी तीन हजार ७४३ गुन्ह्यांची उकल झाली असून दोन हजार ६१८ मोबाइल परराज्यातून हस्तगत करण्यात आले आहेत. अनेक वेळा चोरलेले मोबाइल परराज्यात विकण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.
मुंबई विभागातून चोरीला गेलेले मोबाइल महाराष्ट्राबरोबरच उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिशा, दिल्ली, हरियाणा, पंजाब, केरळ, जम्मू काश्मिरसह अन्य राज्यांतून हस्तगत करण्यात आले आहेत. चोरीला गेलेले मोबाइल परराज्यातून हस्तगत करण्यासाठी लोहमार्ग पोलिसांचे विशेष पथकही तैनात करण्यात येते.मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मुंबई लोहमार्ग हद्दीत मोबाईल चोरीचे गुन्हे
मध्य रेल्वे२०२१दाखल गुन्हे – २६७४उकल झालेले गुन्हे -१००५२०२२दाखल गुन्हे – ४०३९उकल झालेले गुन्हे – १२७३
पश्चिम रेल्वे२०२१दाखल गुन्हे – १३९५उकल झालेले गुन्हे – ६७८
२०२२दाखल गुन्हे – २०५१उकल झालेले गुन्हे -७८७