एनएफओ खुला होण्याची तारीख ०७/०९/२०२२;
बंद होण्याची तारीख २१/०९/२०२२
मुंबई, सप्टेंबर 2022: कोटक महिंद्रा असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (“केएमएएमसी” / “कोटक म्युच्युअल फंड”) तर्फे आज कोटक बिझनेस सायकल फंडचा शुभारंभ होत असल्याचे जाहीर करण्यात आले. ही एक खुला पर्याय असणारी योजना असून ती व्यवसाय चक्रावर आधारित कल्पना आहे. ती आर्थिक चक्राच्या माध्यमातून संचालित कंपन्यांच्या क्षेत्रात आणि स्टॉक्समध्ये गुंतवणूक करेल.
सार्वजनिक सदस्यतेसाठी ही योजना ७ सप्टेंबर २०२२ रोजी खुली होईल आणि २१ सप्टेंबर २०२२ रोजी बंद होईल. गुंतवणूकदार एनएफओ कालवधीमध्ये किमान रु. ५०००/- रुपये गुंतवू शकतात.
‘बिझनेस सायकल’ या शब्दात अनेक टप्प्यांचा समावेश आहे. कंपनी किंवा विशिष्ट क्षेत्र हे या कालावधीमध्ये व्यवसायातील विस्तार, नियमन आणि विरोधाचा सामना करतात.
कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी कोटक बिझनेस सायकल योजना विविध आर्थिक मापदंड (जीडीपी ग्रोथ, करंट अकाउंट डेफीसीट, कोर्पोरेट प्रॉफीट ग्रोथ ट्रेंड, इन्फ्लेशन), गुंतवणूक निर्देशक (कॅपेक्समधील गुंतवणूक, कपॅसिटी युटीलायझेशन, क्रेडीट ग्रोथ इ.), व्यवसाय आणि आघाडीचे आर्थिक निर्देशक (बिझनेस कॉन्फिडन्स इंडेक्स, पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स) बाबी विचारात घेतो.
कोटक महिंद्रा असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचे समूह अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक निलेश शहा म्हणाले, “संपूर्ण विभागांमध्ये व्यवसाय चक्राच्या विविध टप्प्यांवर चांगले काम करणारे इक्विटी स्टॉक्स असल्याने गुंतवणूकदारांना त्यांच्या इक्विटी पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्याची ही एक चांगली संधी कोटक बिझनेस सायकल फंड देऊ करते. अगदी आर्थिक मंदीच्या आव्हानात्मक काळातही या कंपन्यांनी आव्हानांचा सामना करून विविध आर्थिक मापदंडांवर चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन केले.”
अधिक माहितीसाठी कोटक बिझनेस सायकल फंडच्या https://youtu.be/TjIHCotf41o संकेतस्थळाला भेट द्या.
About Kotak Mahindra Asset Management Company Limited
Kotak Mahindra Asset Management Company Limited (KMAMC) – a wholly owned subsidiary of Kotak Mahindra Bank Limited (Kotak), is the Asset Manager for Kotak Mahindra Mutual Fund (KMF). KMAMC started operations in December 1998 and as of 30th June, 2022, has approximately 43.8 lakh investor folios in various schemes. KMF offers schemes catering to investors with varying risk – return profiles and was the first fund house in the country to launch a dedicated gilt scheme investing only in government securities. The company is present in 82 cities and has 87 branches as of 30th June, 2022.