नुकत्याच पार पडलेल्या एका माहिती कार्यसत्रात, फाउंडेशनने क्रॉनिक किडनी डिसीज (सी.के.डी) सोबत रूग्णांना जगण्याबद्दल त्यांच्या तज्ञांचा सल्ला सांगण्यासाठी मुंबईतील उच्च नेफ्रोलॉजिस्टना एकत्र आणले आहे
सी.के.डी, डायलिसिस आणि प्रत्यारोपण नंतरच्या पौष्टिक आहाराच्या 130 पाककृतींची माहिती देणाऱ्या ‘हेल्दी रेसिपीज फॉर सी.के.डी’ या पुस्तकाचे सुद्धा या कार्यक्रमात प्रकाशन करण्यात आले.
मुंबई : सप्टेंबर, 2022 – क्रॉनिक किडनी डिसीज (सी.के.डी) ने पीडित रुग्णांच्या चिंता आणि प्रश्न सोडविण्यासाठी मुंबई-स्थित किडनी वॉरियर्स फाउंडेशनने (के.डब्ल्यू.एफ) शहरातील सर्वोच्च नेफ्रॉलॉजिस्ट सोबत माहिती कार्यसत्राचे आयोजन केले होते. रोगाच्या 1-5 या प्रगतीशील टप्प्यांचा वेग कमी करण्यासाठी सर्व आवश्यक चरण रुग्णांना सांगणे आणि त्याच सोबत त्यांना त्यांचे डायलिसिस चांगले व्यवस्थापित करण्याचे शिक्षण देणे आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणानंतर सामान्य जीवन कसे जगायचे हे शिकविणे, या सर्व बाबींवर कार्यसत्रात उपस्थित तज्ञांच्या कौशल्याची माहिती देण्यात आली.
अर्ध्या दिवसाच्या चर्चासत्रात किडनी वॉरियर्स फाउंडेशनने ‘हेल्दी रेसिपीज फॉर सी.के.डी’ या पुस्तकाचे प्रकाशनही केले, ज्यात डायलिसिस झालेल्या किंवा प्रत्यारोपण केलेल्या मूत्रपिंडाच्या रुग्णांसाठी 130 पाककृती आहेत. सी.के.डी साठी आरोग्य, काळजी आणि पोषण याबाबतीत सुद्धा डॉक्टरांनी काही टिपा सांगितल्या.
अमेरिकन असोसिएशन ऑफ किडनी पेशंट आणि युरोपियन किडनी हेल्थ अलायन्सच्या मते, सी.के.डी 2040 पर्यंत मृत्यूचे पाचवे सर्वात मोठे जागतिक कारण बनण्याची अपेक्षा केली जात आहे आणि त्यामुळे मूत्रपिंडाच्या रूग्णांना जास्त काळ जगण्यासाठी लवकर शिकवणे आणि त्यांनी स्वीकार करणे गरजेचे आहे व या क्षेत्रात के.डब्ल्यू.एफ गेल्या पाच वर्षांपासून अथकपणे काम करत आहे.
या कार्यक्रमाची सांगता रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांसह प्रश्नोत्तराच्या सत्राने झाली, ज्यांना सी.के.डी, डायलिसिस आणि यशस्वी प्रत्यारोपण होऊन अनेक वर्षे जगत असलेल्या लोकांशी संवाद साधण्याची संधी सुद्धा मिळाली. भारताचे सर्वात मोठे डायलिसिस उपलब्ध करून देणारे नेटवर्क, नेफ्रोप्लसने, या उपक्रमासाठी किडनी वॉरियर्स फाउंडेशन सोबत युती केली आणि या कार्यक्रमात माहिती, काळजी आणि मदत प्रदान केली.
किडनी वॉरियर्स फाउंडेशन ही रुग्ण कल्याणासाठी काम करणारी जगातील पहिली आणि एकमेव किडनी पेशंट ॲडव्होकसी संस्था आहे. 20 डिसेंबर 2017 रोजी तिची संस्थापना करण्यात आल्यापासून या संस्थेने शिक्षणाद्वारे, वैयक्तिक आव्हानांची चर्चा करून आणि मूत्रपिंड समुदायाला पाठिंबा देऊन त्यांचा आजार ‘आता वैयक्तिक लढाई राहिलेली नाही’, असा संदेश देऊन रूग्णांना त्यांची मानसिक स्थिती चिंता सोडून स्वीकृतीमध्ये बदलण्यात मदत करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. सी.के.डी चे निदान झालेल्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने किडनी वॉरियर्स फाउंडेशनचे कार्य अधिक संबंधित बनते.