‘भाऊबळी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर सर्वत्र ‘भाऊबळी’ ची चर्चा रंगली आहे. मनोज जोशी, किशोर कदम, मेधा मांजरेकर, ऋषिकेश जोशी, संतोष पवार, प्रियदर्शनी इंदलकर, आशय कुलकर्णी, रेशम टिपणीस आणि अनेक कमालीच्या विनोदवीरांसह प्रेक्षकांचे भन्नाट मनोरंजन करायला ‘भाऊबळी’ सज्ज आहे.
‘भाऊबळी’ च्या ट्रेलर ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून विनोदाने भरलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढली आहे. नुकताच सोशल मीडिया वर ‘भाऊबळी’ चा नवा पोस्टर झळकला असून मनोज जोशी यांच्या विरोधी भूमिकेत किशोर कदम दिसत आहेत. त्यांच्यातल्या वैराची कमाल विनोदी कहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या दोघांच्या युद्धाचे नेमके कारण चित्रपट पाहिल्यावरच कळेल. विनोदी तरी मोलाची शिकवण देऊन जाणारा हा चित्रपट असेल असं वाटत आहे.
झी स्टुडिओज प्रस्तुत, समीर पाटील दिग्दर्शित ‘भाऊबळी’ हा विनोदी चित्रपट येत्या १६ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे निर्माते नितीन वैद्य, निनाद वैद्य, अपर्णा पाडगावकर आहेत.