‘
‘बॉईज ३’ च्या चित्रपटासोबतच त्यातील गाणी ही तितकीच लोकप्रिय ठरत आहेत. सोनू निगमच्या जादुई आवाजातल्या ‘मनात शिरली’ या गाण्यानंतर ‘मस्त मौला’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतीक लाड यांच्या त्रिकूटासोबतच्या या प्रवासात विदुला त्यांची साथ देते आहे. ‘बॉईज ३’ मधील हे गाणं नक्कीच तुमच्या प्लेलिस्ट मध्ये समाविष्ट करण्यासाठी सर्वोत्तम जर्नी साँग आहे. रोड ट्रिप वर निघालेले बॉईज व त्यांच्या या प्रवासात त्यांची साथ देणारी विदुला ह्यांच्या एकत्र प्रवासातील मज्जा, कर्नाटकातील निसर्गरम्य वातावरण या गाण्यात दिसत आहे. ‘मस्त मौला’ हे गाणं रवींद्र खोमणे व मुन्नावर अली ह्यांनी गायले आहे. या जर्नी साँगला अवधूत गुप्ते यांनी संगीत दिले आहे. गाण्याचे बोल समीर सावंत यांनी लिहिले आहेत. ‘बॉईज ३’ चित्रपटासोबतच त्यातील गाणी ही तितकीच लोकप्रिय ठरत आहेत.
सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत ‘बॉईज ३’ चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. येत्या १६ सप्टेंबर रोजी ‘बॅाईज ३’ चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.