मुंबई : गणेशोत्सव काळात लोकल, मेल, एक्स्प्रेस गाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी असते याचा फायदा घेत अनेकजण चोऱ्या करतात. अलिकडे मुंबईत मोबाईल फोन चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या पाच दिवसात मुंबई विभागात मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर १६९ मोबाईल चोरीला गेले आहेत.
गणेशोत्सव काळात अनेक लोक खरेदीसाठी किंवा गावाला जाण्यासाठी निघतात. या काळात प्रवाशांची संख्या तुलनेने जास्त असते. याच गर्दीचा फायदा घेऊन चोरांनी मोबाईल फोन लंपास केले आहेत.
गेल्या काही दिवसांत एवढे मोबाईल गेले चोरीला…
- २६ ऑगस्ट – ३७
- २८ ऑगस्ट – ३४
- २९ ऑगस्ट – ३१
- ३० ऑगस्ट – ३७
- ३१ ऑगस्ट – ३०
दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, कल्याण, वांद्रे, अंधेरी, कांदिवली, नालासोपारा, वाशी, वडाळा या स्थानकांमध्ये मोबाईल चोरी सर्वाधिक होत असल्याची माहिती मिळाली आहे. मोबाईल चोरीसोबतच, पाकिट, बॅगचोरीच्या घटनांमध्येही वाढ झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.