पुणे महापालिकेचे दोन भाग होणार : मंत्री चंद्रकांत पाटील
दरम्यान पूणेकरांनी अजून पर्यंत तरी खुल्लेपणा नाराजी व्यक्त केली नसली तरी चौकांमधील चर्चेत पुण्याचे तुकडे पाडण्यावर नाराजी व्यक्त केली आहे . एकप्रकारे मुंबईला सुध्दा हा सुचक इशारा दिला आहे. भाजपा अगोदरच छोट्या प्रशासनावर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. कारभार बरोबर सत्ताही ताब्यात राहते यासाठी हा अट्टाहास असतो.
पुणे महापालिकेचे दोन भाग करण्याची गरज असल्याचे विधान राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. कॅबिनेट मंत्र्यांनी असे विधान केल्यामुळे आता पुणे महापालिकेचे दोन भाग करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
पुण्यात असंख्य प्रश्न आहे. पुणे महापालिकेत आता 23 गावं त्याआधी 11 गावांचा समावेश करण्यात आला. पुण्याचे भौगोलिक क्षेत्र हे देशातील कुठल्याही महापालिकेपेक्षा सर्वात मोठं क्षेत्र आहे. त्यामुळे पुणे महापालिकेचे किमान दोन भाग करण्याची आता आवश्यकता आहे. भाग जितके लहान होतात तितके त्यांचे प्रशासन करणे सोपे होते, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
समस्या सोडवणे सोपे
जी राज्ये छोटी आहेत त्यांचे प्रशासन करणे हे सोपे असते. त्यामुळे महापालिकांच्या बाबतीतही तसेच आहे. भाग छोटे झाल्याने लोकसंख्या ही विभाजित होते आणि त्यामुळे या अशा भागांमध्ये असलेल्या समस्या सोडवणे आपल्याला सोपे होते, असेही पाटील यांनी यावेळी म्हटले आहे.