मुंबई : सर्वत्र गणेश उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. बाॅलीवूड विश्वातील अनेक कलाकार मुंबई येथील प्रसिद्ध गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जातात. त्यांचे छायाचित्रे ती आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर करत असतात.
मुंबई (Mumbai) येथील प्रसिद्ध अशा गणपतीपैकी अंधेरीच्या राजाच्या दर्शनासाठी गायिका लीझा मिश्रा (Liza Mishra) आली होती.
मात्र लीझा मिश्राने तोकडे कपडे घालून आली होती. त्यामुळे तिला अंधेरीच्या राजाच्या मंडळाकडून शाल देण्यात आली. त्यानंतरच लिझाला गणपती बाप्पाचे दर्शन घेता आले आहे. (Bollywood News)
अंधेरी राजाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांनी पूर्ण शरीर झाकतील अशीच कपडे परिधान करावीत, असा नियमच मंडळाने केला असल्याचा सांगितले जात आहे.