वसई विरार महापालिकेने तलावांचे प्रदूषण रोखण्यासाठी ६५ ठिकाणी कृत्रिम तलाव उभारले असून फिरत्या हौदांची व्यवस्था केली आहे.
गणेश चतुर्थी २०२२
वसई : बुधवारपासून गणेशोत्सव सणाला प्रारंभ होत असून वसई विरार आणि मीरा भाईंदर शहर गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.
उत्सव सुरळीत पार पडण्यासाठी सव्वा तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यंदा आयुक्तालयात १२०० हून अधिक सार्वजनिक मंडळांची नोंद झाली आहे. वसई विरार महापालिकेने तलावांचे प्रदूषण रोखण्यासाठी ६५ ठिकाणी कृत्रिम तलाव उभारले असून फिरत्या हौदांची व्यवस्था केली आहे.