‘टीव्ही 9 मराठी’ने चायनीज कृत्रिम झेंडूच्या फुलांचा आणि नैसर्गिक झेंडूच्या फुलांचा आढावा घेतला. दोन्ही फुलांमधली किमतीची तफावत आणि ग्राहकांचा कल नेमका काय? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
किंमतीत किती तफावत?
‘टीव्ही 9 मराठी’ने चायनीज कृत्रिम झेंडूच्या फुलांचा आणि नैसर्गिक झेंडूच्या फुलांचा आढावा घेतला. दोन्ही फुलांमधली किमतीची तफावत आणि ग्राहकांचा कल नेमका काय? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. दादरच्या बाजारपेठेमध्ये कृत्रिम झेंडूच्या फुलांची किंमत ही जवळपास 600 रुपये प्रति किलो असल्याचा पाहायला मिळालं. ही फुलं मुख्यतः डेकोरेशन आणि इतर कामकाजासाठी वापरले जातात. त्यामुळे या फुलांची मागणी गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढलीय.
..म्हणून मागणी घटली
दुसरीकडे दादरच्या फुल मार्केटमध्ये नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या झेंडूच्या फुलांची किंमत प्रति किलो 60 ते 70 रुपये असल्याचा पाहायला मिळालं. विक्रेत्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनीही आपली कैफियत टीव्ही 9 मराठीसमोर मांडली. झेंडूंच्या फुलांचे विक्रेते म्हणतात की,
प्लास्टिकची फुलं खरेदी केल्यामुळे ती दीर्घकाळ टिकतात आणि त्यामुळेच लोक काहीशा प्रमाणामध्ये नैसर्गिक फुलं खरेदी करत नाहीत. मात्र त्यामुळे आमच्या व्यवसायावरती मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होतोय. दरवर्षी सणासुदीच्या महिन्यांमध्ये प्रति महिना जवळपास 50 कोटीहून अधिकची उलाढाल दादरच्या फुल मार्केटमध्ये पाहायला मिळते. मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरही यंदा आठ ते दहा कोटी रुपयांचा फटका बसलाय.