८७% मुस्लिम धर्मियांच्या देशात एका खास कारणासाठी गणपती बाप्पा नोटेवर विराजमान झाले आहेत.
Ganesh Chaturthi 2022: गणरायाचे भक्त केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आहेत. गणेश चतुर्थी निमित्त अनेक देशांमध्ये श्रद्धने गणेशाची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. गणेशोत्सवाचा सोहळा विधिवत साजरा करून विसर्जनापर्यंत सर्वकाही अगदी पद्धतशीर साजरे केले जाते. काही देशांमध्ये मूळचे भारतीय असणारे नागरिक गणेशोत्सव साजरा करतात तर काही ठिकाणी परदेशी नागरिक सुद्धा बाप्पाच्या भक्तीत तल्लीन होऊन सणांचा आनंद लुटतात. अशाच एका देशाने बाप्पावरील श्रद्धेपोटी चक्क आपल्या देशाच्या चलनावर गणरायाला स्थान दिले आहे. विशेष म्हणजे या देशातील तब्ब्ल ८७.५ टक्के लोकसंख्या मुस्लिम धर्मिय आहे.
गणपतीला शिक्षण, कला आणि विज्ञान याचा देव मानतात, हा ६४ कलांचा अधिपती विद्येची देवता म्हणून प्रसिद्ध आहे. याच भावनेतून इंडोनेशियाच्या चलनावर बाप्पाचे चित्र छापलेले आहे. विशेष म्हणजे इंडोनेशिया हा मुस्लिम बहुसंख्येचे देश आहे येथील केवळ तीन टक्के लोकसंख्या हिंदूधार्मिय आहे.