राष्ट्रीय, २९ ऑगस्ट २०२२: नेफ्रोप्लसने आपल्या सेवांचा उझबेकिस्तान प्रजासत्ताकमध्ये आणखी विस्तार केला आहे. उझबेकिस्तान प्रजासत्ताकच्या आरोग्य मंत्रालयाशी असलेल्या व्यापक सहयोगाचा भाग म्हणून कंपनी टर्नकी तत्त्वावर चार डायलिसिस केंद्रे बांधत आहे. यासाठी कंपनीला १०० दशलक्ष डॉलर्सचे कंत्राट मिळाले आहे. या कंत्राटानुसार कंपनी स्वतंत्रपणे ही केंद्रे उभारेल आणि कार्यान्वित करेल. तीन केंद्रे यापूर्वीच कार्यान्वित झाली आहेत.
नेफ्रोप्लसने दोन नवीन डायलिसिस केंद्रांच्या उद्घाटनाची घोषणा केली आहे. यापैकी एक केंद्र उरगेंचमध्ये, तर दुसरे बोगोटमध्ये आहे. कॅराकॅल्पाकस्तानमधील नुकुस येथील पहिले केंद्र एप्रिल’२२मध्ये कार्यान्वित झाले आहे. नेफ्रोप्लसच्या विस्तारणाऱ्या कार्यक्षेत्रातील हे सर्वांत नवीन आस्थापन आहे. ताश्केंट येथे चौथे केंद्र सुरू करण्याची कंपनीची योजना आहे. हे केंद्र १६० बेड्सचे असणार आहे.
नेफ्रोप्लस उझबेकिस्तानमधील १,१०० रुग्णांना सेवा देण्यासाठी उच्च दर्जाचे डायलिसिस केंद्र सुरू करणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत नेफ्रोप्लसने १०० टक्के मालकीची स्थानिक उपकंपनी केंद्रे चालवण्यासाठी स्थापन केली आहे. उझबेकिस्तानमध्ये समन्वयित व सोयीस्कर रुग्ण अनुभव देण्यासाठी आपले रेनअॅश्युअर नियम अमलात आणण्याचे उद्दिष्ट नेफ्रोप्लसपुढे आहे.
कोविड-१९ साथीमुळे आव्हानात्मक परिस्थिती असूनही, नेफ्रोप्लसने यशस्वीरित्या तीन केंद्रे कार्यान्वित केली आहेत. यानिमित्त नेफ्रोप्लसचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विक्रम वुप्पाला म्हणाले: “दर्जेदार डायलिसिस सेवा देण्याची आमची महत्त्वाकांक्षा हा आमच्या निष्ठेचा पुरावा आहे. उझबेकिस्तानमध्ये नेफ्रोप्लसने टर्नकी तत्त्वावर बांधकाम ते लोकार्पण केले आहे आणि यापुढे कंपनी पेरिटोनीयल डायलिसिस सेवा आणणार आहे, यामध्ये रुग्ण त्यांच्या घरात राहून डायलिसिसची सेवा प्राप्त करू शकतील.”
उझबेकिस्तान प्रजासत्ताकच्या आरोग्य मंत्रालयातील पीपीपी प्रमुख श्री. गॅपारोव फारुक अब्दुकाक्झारोविच या यशाबद्दल व त्याच्या नंतरच्या प्रभावाबद्दल म्हणाले, “देशात दर्जेदार डायलिसिसची मागणी वाढत असताना, अनन्यसाधारण व गतीशील पीपीपी प्रारूपामार्फत देशातील आरोग्यसेवा सुधारण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. यामध्ये नेफ्रोप्लसची निवड एका खुल्या स्पर्धात्मक बोली प्रक्रियेद्वारे करण्यात आली आहे. कोविड-१९ साथीमुळे आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होऊनही, उझबेकिस्तान प्रजासत्ताकमध्ये परवडण्याजोगी व आघाडीची आरोग्यसेवा संरचना विस्तारण्यासाठी सरकार सातत्याने काम करत आहे.”