4,500 हून अधिक अभियांत्रिकी विद्यार्थी, 1,000 प्राध्यापकांनी आत्तापर्यंत सॅमसंग आर अँड डी इन्स्टिट्यूट, बंगलोरमध्ये थेट आर अँड डी प्रकल्प करण्यासाठी आणि उद्योगाचे ज्ञान मिळवण्यासाठी काम केले आहे.
विद्यार्थ्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि आय ओ टी सारख्या अत्याधुनिक डोमेनमध्ये पेटंट दाखल केले आणि तांत्रिक पेपर प्रकाशित केले.
भारत – 29 ऑगस्ट 2022 – सॅमसंग, भारतातील सर्वात मोठा ग्राहक असलेला इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड, 2025 पर्यंत भारतातील 70 अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये आपला अनोखा उद्योग-शैक्षणिक कार्यक्रम सॅमसंग प्रिझम (प्रिपेअरिंग अँड इन्स्पायरिंग स्टुडंट माइंड्स) चा विस्तार करीत आहे. भारतीय इनोव्हेशन इकोसिस्टमला चालना देणे आणि विद्यार्थ्यांना उद्योगासाठी तयार करणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे. हा कार्यक्रम अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना पेटंट दाखल करण्यासाठी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि आय ओ टी सारख्या अत्याधुनिक डोमेन्समध्ये तांत्रिक पेपर प्रकाशित करण्यास प्रवृत्त करण्यात यशस्वी ठरला आहे, ज्यामुळे सॅमसंगच्या डिजिटल इंडियाच्या सशक्ती कारणाच्या व्हिजनला बळकटी मिळाली आहे.
सॅमसंग प्रिझम ची सुरुवात 2020 मध्ये झाली आणि गेल्या दोन वर्षांत, 4,500 हून अधिक अभियांत्रिकी विद्यार्थी आणि 1,000 प्राध्यापकांनी थेट प्रकल्प यशस्वीरित्या वितरित करण्यासाठी एसआरआय-बी अभियंत्यांसह काम केले आहे. यावेळी, विद्यार्थी आणि प्राध्यापक संघांनी एसआरआय-बी अभियंत्यांसह अनेक पेटंट दाखल केले आहेत आणि अनेक शोधनिबंध सुद्धा प्रकाशित केले आहेत.
कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, सॅमसंग आर अँड डी इन्स्टिट्यूट, बंगलोर (एसआरआय -बी) येथील विद्यार्थी आणि प्राध्यापकांसह सहयोग करते. अभियांत्रिकी महाविद्यालये, त्यांना संशोधन तसेच विकास प्रकल्प (वर्कलेट्स) चार ते सहा महिन्यांत कार्यान्वित करण्यात येते.
विद्यार्थी आणि प्राध्यापकांची टीम आर्टिफिशियल इंटेलिजन्स (व्हिजन टेकसह), मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि कनेक्टेड डिव्हाइसेस आणि 5G नेटवर्क्स यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात थेट आर अँड डी प्रकल्पांवर काम करतात. यामुळे उद्योगाच्या गरजा पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये क्षमता निर्माण करण्यात भरपूर मदत झाली आहे.
भारत सरकारच्या नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) रँकिंगमध्ये देशभरातील उच्च पदांवर असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी आतापर्यंत या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.
सॅमसंग आर अँड डी इन्स्टिट्यूट, बंगलोरच्या टेक स्ट्रॅटेजीचे प्रमुख श्रीमनु प्रसाद म्हणाले, “सॅमसंग प्रिझम कार्यक्रम हे भारतातील तरुणांमध्ये नवोपक्रमाची मानसिकता विकसित करण्यासाठी आमचे योगदान आहे, जे आमच्या शैक्षणिक आणि अभियांत्रिकी विद्यार्थी समुदायाच्या बळावर तयार झाले आहे. सॅमसंगसोबत काम करताना, तरुण विद्यार्थ्यांना आमच्या आर अँड डी केंद्राच्या थेट प्रोजेक्ट्सचा प्रत्यक्ष अनुभव मिळत आहे आणि प्राध्यापकांना अधिक व्यावहारिक उद्योगावाचे अनुभव मिळत आहे. हे विद्यार्थ्यांना उद्योगासाठी तयार करत आहे आणि डिजिटल इंडियाला सशक्त बनवण्याच्या आमच्या व्हिजनला पुढे नेत आहे.“
प्रसाद पुढे म्हणाले, “गेल्या दोन वर्षांमध्ये, आम्ही आधीच या प्रकल्पाचे मजबूत परिणाम पाहिले आहेत. विद्यार्थ्यांचे संघ पेटंट दाखल करत आहेत आणि अत्याधुनिक डोमेनमध्ये तांत्रिक पेपर सुद्धा प्रकाशित करत आहेत.“
प्रिझम कार्यक्रमासह, सॅमसंग भविष्यातील भारतातील नवोन्मेषकांचे कुशल कार्यबल तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर सर्व विद्यार्थ्यांना एसआरआय-बी द्वारे प्रमाणपत्रे दिली जातात आणि आतापर्यंत 300 हून अधिक संघांना त्यांच्या अपवादात्मक कार्यासाठी मान्यता मिळाली आहे आणि त्यांना बक्षीसही देण्यात आले आहे.
प्रत्येक प्रकल्पात तीन विद्यार्थी आणि एक प्राध्यापक, एसआरआय-बी मधील एक मार्गदर्शक असलेल्या टीमद्वारे हाताळला जातो. एसआरआय-बी मधील मार्गदर्शक त्यांना मार्गदर्शन करतो, त्यांना प्रशिक्षण देतो आणि नियमित पुनरावलोकन सुद्धा करतो. प्रत्येक अभियांत्रिकी महाविद्यालयात अनेक संघ असतात आणि विद्यार्थ्यांची निवड एसआरआय-बी द्वारे घेण्यात आलेल्या चाचणीच्या आधारे केली जाते.
सॅमसंग च्या प्रिझम कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की येथील सहयोगी वातावरण त्यांच्याकरिता खूप उपयुक्त ठरले आहे. या कार्यक्रमाद्वारे, ते आव्हानात्मक समस्या विधानांवर काम करण्यास आणि उद्योगातील मोठ्या कंपन्यांच्या कार्याबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी प्राप्त करण्यात सक्षम झाले आहेत. दुसरीकडे प्रोफेसरांनी सांगितले की कार्यक्रमामुळे त्यांना त्यांची तांत्रिक कौशल्ये सुधारण्यास आणि व्यावहारिक उद्योग अनुभव मिळविण्यात खूप मदत झाली आहे.
एसआरआय-बी, जी कोरियाच्या बाहेर सॅमसंगची सर्वात मोठी आर अँड डी सुविधा आहे, ती कम्युनिकेशन प्रोटोकॉल, मल्टीमीडिया (कॅमेरा सोल्यूशन्ससह), एडी टेक, डेटा इंटेलिजन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आयओटी वर केंद्रित आहे. या केंद्राने उत्पादन व्यवस्थापन आणि युएक्स डिझाइन विचारांद्वारे सिओई मध्ये एंड-टू-एंड कौशल्य तयार केले आहे. आर अँड डी केंद्राचे मुख्य उद्दिष्ट जागतिक उत्पादनातील फरक आणि भारतीय बाजारपेठेसाठी अनन्य अंतर्दृष्टी ओळखून समाधाने विकसित करणे आणि ग्राहकांना मूल्य प्रदान करणे, हे आहे. महत्वाची बाब म्हणजे आतापर्यंत, या आर अँड डी केंद्राने भारतात 3,500 हून अधिक पेटंट आणि जागतिक स्तरावर 7,500 पेटंट दाखल केले आहेत.