मुंबई, : प्रत्येक मेकअप युजर्सचे लिपस्टिक व व्यक्तिमत्त्वावरील प्रेम साजरे करण्यासाठी भारतातील सर्वोत्तम कलर कॉस्मेटिक ब्रॅण्ड स्ट्रीट वेअर कॉस्मेटिक्सने लिपस्टिक डेच्या दिवशी त्यांची #LipsDontShy मोहिम सुरू केली. ही अद्वितीय सोशल मीडिया मोहिम पारंपारिक मेक-अपमधील रूढीवादी गोष्टींपासून दूर जाण्यासाठी आणि नवीन लिप ट्रेंड तयार करून #LipArt मध्ये नवीन मार्ग शोधण्यासाठी सुरू करण्यात आली.
२९ जुलै रोजी सुरू झालेल्या सोशल मीडिया सक्रियतेमध्ये सौंदर्य व मेकअप प्रभावक त्यांची सर्वात सर्जनशील लिप आर्ट दर्शवताना आणि अद्वितीय मेकअप शैलींचा प्रयोग करताना पाहायला मिळाले आहे. कलर ब्लॉक्ड लिप ते शिमरपर्यंत, घोषवाक्य ते पोल्का डॉट्स, फुले, पंजे अशा अनेक स्वरूपांमधून त्यांचे वैयक्तिक व्यक्तिमत्त्व आणि शैली दिसून आली. त्यांची विचारसरणी व लूकमध्ये रंग व धमाल भर करत ही मोहीम त्यांच्या कलाकृतींना सर्वात सर्जनशील रूपात व्यापून घेते.
या मोहिमेबाबत बोलताना मुंदीफार्मा ब्युटी प्रॉडक्ट्सचे महाव्यवस्थापक श्री. शहजाद अख्तर म्हणाले, ”स्ट्रीट वेअर कॉस्मेटिक्स हा एक ब्रॅण्ड आहे, जो वैयक्तिक सौंदर्य आणि मूल्यांना प्रशंसित करतो. हा ब्रँड सर्वसमावेशकता, कुतूहल, क्रांतिकारी, तसेच मैत्रीपूर्ण अशा मुलभूत मूल्यांवर बांधला गेला आहे आणि आम्ही सौंदर्याविषयी प्राचीन विचार आणि रूढीवादी कल्पना बाजूला ठेवण्यावर मनापासून विश्वास ठेवतो. #LipsDontShy मोहिमेचा शुभारंभ केल्यामुळे आम्हाला देशभरातील मेकअपप्रेमींना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात अभिमान वाटतो आणि आम्ही हे व्यासपीठ अधिकाधिक कट्टर मेकअपप्रेमींपर्यंत पोहोचवण्यास उत्सुक आहोत.
डिजिटल मोहिमेच्या यशानंतर ब्रॅण्डने आपल्या ऑफलाइन माध्यमांवर या मोहिमेचा विस्तार केला. लिपस्टिक डे साजरा करण्यासाठी स्ट्रीट वेअर कॉस्मेटिक्सने ग्राहकांना सहभागी होण्यासाठी आणि त्यांची स्वतःची #LipArt तयार करण्यासाठी आपल्या ऑफलाइन स्टोअरमध्ये पॉप-अप आयोजित केले. ग्राहकांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी ब्रॅण्डने आपल्या सर्व ग्राहकांना मोफत लिपस्टिक दिल्या.
आधीपासून सहयोगी असलेल्या प्रभावकांच्या व्यतिरिक्त ब्रॅण्ड आणखी ४ प्रभावकांसोबत सहयोग करेल, जे #LipArt बद्दल त्यांचे मत शेअर करणार आहेत. स्ट्रीट वेअर कॉस्मेटिक्स #LipsDontShy मोहिम ऑगस्ट 2022 पर्यंत सुरू राहिल.