RJD नेत्यांवर CBI कडून छापेमारी सुरु
केंद्रीय तपास यंत्रणा CBI आणि ED कडून आता बिहार आणि झारखंडमध्ये छापे टाकण्यात आले आहेत. CBI ने जमीन देवाण- घेवाण प्रकरणी पाटणा येथील RJD आमदार सुनील सिंह, राज्यसभा खासदार अशफाक करीम यांच्यावरही छापेमारी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. बिहारमधील आरजेडी नेत्याची बुधवारी विधानसभेत फ्लोअर टेस्ट होत असतानाच सीबीआयकडून छापा टाकण्यात आला आहे. ईडीकडून झारखंड, तामिळनाडू, बिहार आणि दिल्लीतील 17 ठिकाणी छापे टाकले आहेत. अवैध खाणकाम आणि खंडणी प्रकरणी ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.
झारखंडमध्येही छापेमारी सुरु
प्रेम प्रकाश यांच्याशी संबंधित ठिकाणांवर हे छापे टाकले जात आहेत. प्रेम प्रकाश यांचे अनेक राजकीय नेत्यांबरोबर जवळचे संबंध आहेत. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे आमदार प्रतिनिधी मिश्रा यांची चौकशी करुन त्यांच्यावरही छापा टाकण्यात आला आहे.