मुंबई १० ऑगस्ट २०२२ – पटेल इंजिनियरिंग लिमिटेड (NSE – PATELENG & BSE – 531120), भारतातील एकात्मिक पायाभूत सुविधा आणि बांधकाम सेवा समूहांपैकी एक असलेल्या कंपनीने आर्थिक वर्ष २३ च्या पहिल्या तिमाहीसाठी त्यांचे मर्यादित पुनरावलोकन केलेले आर्थिक परिणाम जाहीर केले आहेत.
एका दृष्टीक्षेपात प्रमुख आर्थिक परिणाम :
तपशील (करोड रुपये मध्ये ) चालू आर्थिक वर्षातील पहिली तिमाही आणि आर्थिक वर्ष २०२२ च्या पहिली तिमाही मधील वार्षिक बदल
चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीतील प्रमुख ठळक मुद्दे (स्टँडअलोन):
चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीसाठी डेट इक्विटी रेशो ०.७७ होता.
चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीमध्ये ३,३०० कोटी रुपयांची नवीन ऑर्डर प्राप्त झाली.
चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीसाठी क्षेत्रनिहाय महसूल योगदान हायड्रो ४९ टक्के, टनेल २२ टक्के, सिंचन १५ टक्के, रस्ता ८ टक्के, आणि इतर ६ टक्के होते.
कामगिरीबद्दल भाष्य करताना, पटेल इंजिनीअरिंग लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री रुपेन पटेल म्हणाले की, “कंपनीच्या तिमाहीतील कामगिरीने अंदाजापेक्षा जास्त कामगिरी केली आहे आणि मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत त्यात लक्षणीय सुधारणा झाली आहे. आमचे सर्व ग्राहक तसेच आमच्या भागधारकांचा पाठिंबा आणि आमच्या कर्मचार्यांचे समर्पण, यामुळे कंपनीला आगामी तिमाहीत आणखी चांगली कामगिरी करण्यास आणि मोठे यश मिळेल. आमचे वर्तमान ऑर्डर बुक सर्वकालीन उच्च पातळीवर आहे. आम्हाला भविष्यात नवीन ऑर्डर मिळत राहण्याची आणि देशाच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी योगदान देत राहण्याची अपेक्षा आहे.”
निकालावर भाष्य करताना, सुश्री कविता शिरवाईकर, संचालक आणि सीएफओ म्हणाल्या, “वाढ आणि यश मिळविण्यासाठी आमची वचनबद्धता कायम आहे आणि पहिल्या तिमाहीतील निकालांनी चालू वर्षाच्या कामगिरीचा पाया घातला आहे. आम्ही निवडकपणे बोली लावणे सुरू ठेवू आणि वाजवी मार्जिनसह शाश्वत प्रकल्पाबाबत स्वारस्य घेऊ तसेच आमच्या अंतर्गत मालमत्ते मार्फत उत्पन्न वाढवून कर्ज कमी करण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये कोणतीही कसर सोडणार नाही. घेऊ आणि आमच्या नॉन कोअर मालमत्तेची कमाई करून कर्ज कमी करण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये कोणतीही कसर सोडणार नाही.”