-
चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीसाठी ईबिटा (EBITDA) ९.४० कोटी रुपये दर्शविला असून एकूण वार्षिक वाढ २२.८२ टक्के.
-
चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीसाठी करपश्चात नफा (PAT) ५.१६ कोटी रुपये म्हणजेच ३९.७९ टक्के वार्षिक वाढ दर्शविण्यात आली.
मुंबई, ११ ऑगस्ट, २०२२, मित्सू केम प्लास्ट लिमिटेड (Mitsu) (BSE:540078), ब्लो मोल्डिंग, इंजेक्शन मोल्डिंग आणि कस्टमाइज्ड मोल्डिंगच्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक अग्रगण्य कंपनी असून कंपनीने आर्थिक वर्ष २३ च्या पहिल्या तिमाहीसाठी त्याचे अनऑडिटेड आर्थिक परिणाम जाहीर केले.
कामगिरीबद्दल भाष्य करताना, मित्सु केम प्लास्ट लिमिटेडचे अध्यक्ष श्री जगदीश देधिया म्हणाले, “आर्थिक वर्ष २२ हे ऐतिहासिक वर्ष असूनही, आम्ही विकासाच्या मार्गावर जोरदारपणे चालत आहोत. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत कंपनीची आर्थिक कामगिरी स्पष्टपणे मजबूत असल्याचे दर्शविते.
कच्च्या मालाच्या किमती सतत उच्च राहिल्या ज्यामुळे आमच्या ऑपरेटिंग मार्जिनवर दबाव निर्माण झाला तथापि वाढत्या विक्रीमुळे कंपनीला मजबूत ऑपरेटिंग नफा नोंदवता आला आणि कंपनीच्या कार्यक्षमतेत वाढ झाल्यामुळे कंपनीच्या नफ्यात वाढ झाली.
विविध आर्थिक आणि राजकीय अस्थिरता असूनही, आम्ही कंपनीच्या भविष्यातील वाढीबद्दल आशावादी आहोत.”