मुंबई : काही दिवसांपूर्वी बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी समोर आली होती. आता बातमी येत आहे की ‘बिग बॉस’ फेम संभावना सेठची काही दिवसांपासून प्रकृती ठीक नाहीये. संभावनाला ताप आला होता, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. फक्त ताप नाही तर भावनाल्या उलटी देखील सुरु होत्या. संभावनाची प्रकृति ठीक नसल्याची माहिती तिचा पती अविनाश द्विवेदीनंनं ब्लॉगच्या माध्यमातून सांगितले. याची माहिती त्यानं काही दिवसांपूर्वी केली होती.
संभावनाचा पती अविनाश द्विवेदीनं सांगितलं की, ‘संभावनाला ताप आहे. यामुळे तिला खूप त्रास होत आहे. संभावनाला आधीच डोकेदुखी आणि ताप होता, परंतु आता तिला खोकला आणि सर्दी आणि सतत उलट्या होत आहेत. संभावनाची तब्येत इतकी बिघडली होती की तिला दवाखान्यात न्यावे लागले.
अविनाश आपली सर्व कामं सोडून संभावनाला सांभाळत आहे. ब्लॉगमध्ये संभावनाचा चेहरा सुजल्याचं दिसत आहे. संभावना या ब्लॉगमध्ये बोलताना दिसते की ती आजकाल एका भयंकर आजाराशी झुंज देत आहे. हा आजार दुसरो कोणता नसून संधीवात (Arthritis) आहे. व्हिडीओमध्ये भावना भावूक झाली आणि IVF प्रक्रियेपासून ते संधिवातापर्यंत तिच्या मनातल्या गोष्टी देखील उघडपणे बोलली. संभावनाला सांगितले की, या आजारामुळे तिला चालण्यास त्रास होत आहे. तिच्या हात-पायांमध्ये नेहमी सूज, वेदना, आणि जड होतात.